Header Ads

Header ADS

होम क्वारंनटाईन केलेल्या घरावरील चिटकविलेले स्टिकर काढलेस गुन्हा

कोल्हापूर : शहरामध्ये बाहेर जिल्हयातून व राज्यातून नागरीक शहरात येत असलेने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. संस्थात्मक अलगीकरण व होम क्वारंटाईन केलेले लोक बाहेर फिरल्यास त्यांच्यावर गुन्हां नोंद करण्याच्या सुचना महापौर सौ.निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी काल प्रभाग समिती सचिवांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे जुना राजवाडा पोलिस स्टेशनला वांगी बोळ येथील होम क्वारंनटाईन केलेली व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्याने आरोग्य निरिक्षक गीता लखन यांनी त्याच्यावर गुन्हां नोंद केला आहे.
होम क्वारंनटाईन केलेल्या घरावर स्टिकर चिटकविण्याचे आदेश आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले होते. त्याप्रमाणे आज होम क्वारंनटाईन केलेल्या नागरीकांच्या घरावर सदरचे स्टिकर्स लावण्यात आले. परंतू काही ठिकाणी असे लावण्यात आलेले स्टिकर्स काढण्याचा प्रयत्न झालेचे निदर्शनास झाले आहे. त्यामुळे आयुक्तांनी असे होम क्वारंनटाईन केलेल्या घरावर लावण्यात आलेले स्टिकर्स जर काढले असतील तर त्याच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश सचिव व नोडल ऑफिसर यांना दिले आहेत. तरी होम क्वारंनटाईन केलेल्या व्यक्तिंनी घरीच थांबावे. कोणीही बाहेर फिरु नये. प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments