Header Ads

Header ADS

कोरोनाबाबत वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक

     कोल्हापूर  : महापालिकेच्यावतीने कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांची निवडणूक कार्यालय येथे व्हेब एक्स व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली.
    आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शहरामध्ये 6 कंटेनमेंट झोन आहेत. या केटेनमेंट झोन मध्ये 14 दिवस दैनदीन सर्व्हेक्षन करण्याच्या सुचना दिल्या. या केटेनमेंट झोन मधील कोणताही नागरीक घरा बाहेर पडणार नाही याची दक्षता पथकाने घ्यावी. तसेच रेडझोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरीकाचे संस्थात्मक अलगीकरण करावे अशा सुचना वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या. समन्वय अधिकाऱ्यांनी संस्थात्मक अलगीकरणाची ठिकाणे वाढवणेसाठी शाळा, कॉलेज, कार्यालय अशी ठिकाणे तयार ठेवा. ग्रीन झोनमधून येणाऱ्या नागरीकांना अलगीकरण कक्षात ठेवायचे का होम क्वारंनटाईन करायचे याबाबत प्रभाग समितीची शिफारस आले नंतर निर्णय घ्यावयाचा आहे. परराज्यातून, परजिल्हयातून आलेले काही नागरीक परस्पर घरी गेले असतील तर त्यांचा शोध घ्या. यासाठी शिक्षक, कार्यकर्ते यांची मदत घ्या. दाट वस्ती असणाऱ्या ठिकाणी दक्ष राहून काम करा. त्याठिकाणी मास्क, सॅनिटाईझर वाटप करा. लोकांचे प्रबोधन होण्यासाठी याठिकाणी जनजागृती करा. अशा सुचनाही आयुक्तांनी सर्व वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या.
    प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तीस-या टप्यातील सर्व्हेक्षणाचे कामकाज चांगले असल्याने समाधान व्यक्त केले. तसेच उर्वरीत सर्व्हेक्षण लवकरात लवकर पुर्ण करण्याबाबतचे निर्देश सर्व वैद्यकिय अधिकारी यांना दिले. त्याचप्रमाणे झालेल्या सर्व्हेक्षणाची वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पडताळणी करणेबाबत सुचना दिल्या. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी भागामध्ये पुन्हा सर्व्हेक्षण करणेबाबत निर्देश दिले. तसेच वैद्यकिय अधिकारी यांनी आपल्या पथकासोबत झोपडपट्टी भागामध्ये फिरती करणेबाबत सांगितले.
आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केंद्र शासनाच्या आयुष आयुर्वेदीक मार्गदर्शक सुचिनूसार कोरोना विरुध्द रोग प्रतिकार शक्ती कशी वाढवता येईल याबाबत शहरातील होमिओपॅथिक डॉक्टर्स आसोशिएशन यांच्या वतीने 50 वर्षावरील नागरीकांना औषधाचे वाटप करण्यात येत आहे. प्रभागातील 50 वर्षावरील प्रत्येक नागरीकांची माहिती ऍ़पद्वारे संकलन करण्याच्या सुचना वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या.
यावेळी आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पाटील, साथरोग अधिकारी डॉ.रमेश जाधव, प्रशासन अधिकारी डॉ.प्रकाश पावरा, डॉ.विद्या काळे व 11 प्राथमीक आरोग्य केंद्राकडी सर्व वैद्यकीय अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे उपस्थित होते.
    शनिवार दि.23 मे 2020 रोजी सदरबाजार येथील प्राथमीक आरोग्य केंद्राला आयुक्तानी भेट दिली. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून सदरबाजार व विचारेमाळ झोपडपट्टी मध्ये सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला तसेच विनामास्क शिवाय फिरु नये अशा सुचना दिल्या.

No comments