Header Ads

Header ADS

जिल्ह्यातील आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : वाडा, देवगड येथील महिलेचा ( जिल्ह्यातील पाचवा कोरोना बाधीत रुग्ण ) कोरोनाचा अहवाल औषधोपचारांनंतर फेरतपासणीमध्ये निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे आज या महिलेस जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
    जिल्ह्यातील सहाव्या, सातव्या आणि आठव्या कोरोना बाधीत रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कात एकूण 51 व्यक्ती आल्या होत्या. यापैकी 40 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून 11 व्यक्तींचे अहवाल प्रलंबीत आहेत.
    जिल्ह्यात एकूण 1 हजार 254 व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्या पैकी 886 व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असून 368 व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 228 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 80 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 8 अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत 1 हजार 72 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 148 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 105 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 55 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, 37 रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटर मध्ये, 13 रुग्ण कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 5 हजार 206 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 8 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 3 रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून 5 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
    परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अखेर एकूण 33 हजार 447 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

No comments