Header Ads

Header ADS

राजस्थानमधील मजुरांना नोंदणी करण्याचे आवाहन

    सिंधुदुर्गनगरी : लॉकडाऊन मुळे जिल्ह्यात अडकलेल्या राजस्थानमधील नागरिकांना त्यांच्या गावी जाता यावे, यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजस्थानसाठी श्रमिक विशेष रेल्वे सोडण्याचे प्रस्तावित आहे. तरी जिल्ह्यात अडकलेल्या राजस्थानातील कामगार, मजूर, विद्यार्थी, व्यापारी अथवा अन्य व्यक्ती यांनी त्यांच्या राज्यात जाण्यासाठी आपली नावे संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांकडे दिनांक 22 मे 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत नोंदवावीत असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

    या प्रवाशांना त्यांच्या तालुक्यातील बस स्थानकावरुन वैद्यकीय तपासणी करुन एस.टी. बसने सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्थानकावर आणण्यात येणार आहे. त्यांच्या या प्रवासाची सोय मोफत करण्यात येणार आहे. तसेच रेल्वे प्रवासही मोफत असणार आहे. तरी राजस्थानातील जे नागरिक त्यांच्या मुळ गावी जाऊ इच्छितात त्यांनी त्वरीत त्यांची नोंदणी संबंधीत तहसिलदारांकडे करावी असेही आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे.

No comments