Header Ads

Header ADS

मालवण तालुक्यात सर्वाधिक 110 मि.मी पाऊस


सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 110 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी वैभववाडी तालुक्यात 24 मि.मी. पाऊस झाल आहे.

जिल्ह्यात सरासरी 71 पूर्णांक 875 मि.मी पाऊस झाला असून तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पासाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 84(169), सावंतवाडी 84(138), वेंगुर्ला 103(133.6), कुडाळ 67(100), मालवण 110(147), कणकवली 25(55), देवगड 78(94), वैभववाडी 24(95), असा पाऊस झाला आहे.

तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात 86.20 मि.मी. पाऊस

तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 86.200 मि.मी. पाऊस झाला आहे. तर देवघर प्रकल्प क्षेत्रात 26.50 मि.मी आणि कोर्ले-सातंडी क्षेत्रात 29.00 मि.मी. आणि अरुणा प्रकल्प क्षेत्रात 50.20 पाऊस झाला आहे.

जिल्ह्याताली मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढील प्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 215.8900 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 48.26 टक्के भरलेला आहे.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर – 26.1740, अरुणा – 18.7100, कोर्ले- सातंडी – 22.3200. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढील प्रमाणे – शिवडाव – 0.9990, नाधवडे – 1.8179, ओटाव – 1.6476, देंदोनवाडी – 0.2194, तरंदळे – 0.7330, आडेली – 0.0160, आंबोली – 0.2980, चोरगेवाडी – 0.6050, हातेरी – 0.2300, माडखोल – 1.0070, निळेली – 0.3020, ओरोस बुद्रुक – 0.4660, सनमटेंब – 0.4380, तळेवाडी – डिगस – 0.1910, दाभाचीवाडी – 0.5250, पावशी – 0.7240, शिरवल – 0.4400, पुळास – 0.1080, वाफोली – 0.0180, कारीवडे – 0.1160, धामापूर – 0.4710, हरकूळ – 0.4260, ओसरगाव – 0.0160, ओझरम – 0.4240, पोईप – 0.0, शिरगाव – 0.0250, तिथवली – 0.3850, लोरे – 0.0560 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

No comments