आरोग्य विभागाच्यावतीने तिसऱ्या टप्यात 6169 घरांचे व 26442 लोकांचे सर्व्हेक्षण
कोल्हापूर : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पाʉर्ाभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 144319 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 628532 नाग्रीकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 145102 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 643961 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या टप्यात दि.2 जून 2020 रोजी 6169 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 26442 नागरीकांची तपासणी करण्यात आली. सदरचे सर्व्हेक्षण टेंबलाईवाडी, विक्रमनगर, माकडवाला वसाहत, रुक्मिणीनगर, आयोध्या पार्क, टाकाळा, कदमवाडी, विचारेमाळ, सदरबाजार, जाधववाडी, रामानंदनगर, जरगनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, नेहरुनगर, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, राजेंद्रनगर, ताराराणी कॉलनी, एस.एस.सी.बोर्ड, मोतीनगर, बावडा वसाहत, जोशीनगर, ब्रम्हेʉार पार्क, शहाजी वसाहत, इंगवले गल्ली, सरनाईक वसाहत, प्रथमेश नगर, साईपूजानगर, देवकरपाणंद गोंविद पार्क, आझाद गल्ली, न्यू पॅलेस, नागाळा पार्क, न्यू कणेरकर नगर, नाना पाटील नगर, लक्षतीर्थ वसाहत, अंबाई टँक, हरीओमनगरया ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. या तिसऱ्या टप्यामध्ये आज अखेर 146490 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 636447 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा 11 नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.
No comments