केंद्रीय लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबरला
नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, 4 ऑक्टोबर रोजी यूपीएससी आणि आयएफएसची पूर्वपरीक्षा, तर 8 जानेवारी 2021 रोजी मुख्य परीक्षा होणार आहे. भारतीय वन सेवेची मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे.
एनडीए व एनए परीक्षा (1) तसेच एनडीए व एनए परीक्षा (2) एकाच दिवशी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. यूपीएससीच्या उर्वरित परीक्षार्थींच्या मुलाखतींना 20 जुलैपासून सुरुवात होणार असून, मुलाखतीच्या तारखा उमेदवारांना स्वतंत्रपणे आयोगाकडून कळविण्यात येतील. यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेसाठी दरवर्षी सुमारे दहा लाख विद्यार्थी नोंदणी करतात. जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात यादृष्टीने लोकसेवा आयोग अर्ज मागवीत असतो. दरवर्षी पूर्वपरीक्षा एप्रिल/मे महिन्यात होत असते, तर मुख्य परीक्षा जून महिन्यात होत असते. तथापि, कोरोना संक्रमणामुळे परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

No comments