Header Ads

Header ADS

शेतकरी व शेतमजूरांना शेजारच्या जिल्हयात शेतीकामासाठी ये-जा करण्यास दैनंदिन पास देणार : जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर, (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थलसीमा हद्दीला लागून असणाऱ्या जिल्ह्यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. अशा शेतकऱ्यांना तसेच शेतमजूरांना ये-जा करण्यासाठी दैनंदीन पास देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांची सक्षम प्रधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोरोना विषाणू (कोव्हिड )चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, मधील तरतूदी आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम मधील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहेत. सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत दिनांक जून रोजी रात्री . वा. पर्यंत वाढविली आहे.मात्र लॉकडाऊमध्ये शेती काम करण्यासाठी शेतकरी, शेतमजूरांना शासनाने परवानगी दिली आहे.

शेती क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांना/शेतमजुरांना कोल्हापूर जिल्ह्याच्या शेजारील जिल्हयातून ये-जा करणार आहेत, त्या शेतकाऱ्यांना तसेच शेतमजूरांना दैनंदिन पास देण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांना प्राधिकृत केले असून त्यांनी संबंधित शेतक-यांना / शेतमजूरांना पास वितरीत करण्यापूर्वी शेतक-यांना / शेतमजूरांना तपासणी करुन, पात्र व्याक्तीसच (एश्रळसळलश्रश शिीीेप) पास देण्याबाबतची कार्यवाही करावी, तसेच निर्बंधामधून सुट देण्यात आलेली वाहने व व्यक्ती यांच्याबाबतीत राज्य शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून वेळोवेळी दिलेल्या सूचाना, सामाजिक अंतर, मास्क वापर, निर्जनुकीकरण इ. दक्षता घेण्याची जबाबदारी सबंधिताची राहील. याबाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिरण यांना सादर करणेही गरजेचे असल्याचे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

No comments