Header Ads

Header ADS

आरोग्य विभागाच्यावतीने चौथ्या टप्यात 980 घरांचे व 4349 लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर  : भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या पाʉर्ाभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. पहिल्या टप्यामध्ये दि.18 मार्च पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 144319 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 628532 नाग्रीकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच दुसऱ्या टप्यामध्ये दि.21 एप्रिल पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 145102 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 643961 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्यामध्ये दि.15 मे पासून सुरु करण्यात आलेले संपूर्ण शहराचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून यामध्ये 154895 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 669907 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चौथ्या टप्यात दि.17 जून 2020 रोजी 980 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये 4349 नागरीकांची तपासणी करण्यात आली. सदरचे सर्व्हेक्षण कसबा बावडा, कारंडे मळा, सदर बझार, बापट कँम्प, जाधववाडी, कदमवाडी, खंडोबा मंदीर, शहाजी वसाहत, वेताळमाळ तालीम, हराळे गल्ली, मरगाई गल्ली, सानेगूरुजी वसाहत, फुलेवाडी या ठिकाणी घरोघरी जाऊन करण्यात आले. या चौथ्या टप्यामध्ये आज अखेर 50979 घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्य 224282 नागरीकांची तपासणी करण्यात आली आहे. सदरचा सर्व्हे हा 11 नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचा-यांमार्फत करण्यात आला आहे.

No comments