पल्स ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशिनच्या सहाय्याने पोलिसांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पोलिस दलामार्फत पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशिनच्या सहाय्याने आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक यांनी दिली.
देशात व राज्यात सध्या लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या कालावधित पोलिस दल सतर्कपणे दैनंदिन कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्य बजावताना पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा जनतेशी थेट संपर्क येत असतो. कळत नकळत पोलिस कोरोना विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी पल्स ऑक्सिमीटर व इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशिनद्वारे करण्यात येणार आहे.
प्लस ऑक्सिमीटरच्या माध्यमातून रक्तातील हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहन क्षमता ओळखण्यास मदत होणार असून कोविड-19 रोगाचे प्राथमिक लक्षण असलेल्या तापाबाबतची माहितीही मिळणार आहे. त्यासाठी इन्फ्रारेड थर्मल स्कॅनर मशीनचा उपयोग करण्यात येणार आहे. या मशीनच्या माध्यमातून शरिरातील तापमानाच्या नोंदी व रक्तातील ऑक्सिजनची नोंद घेण्यात येणार आहे. या नोंदी Sindhudurg Health Checlist व Sindhu 50 Plus या ऑनलाईन एक्सल शीट मध्ये नमूद करण्यात येतील. यामुळे अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस दलाला त्याचा फायदा होणार आहे.

No comments