भूस्खलनामुळे झोळंबे, दाभोळेसह सहा बाधित गावातील कामांसाठी निधी देऊ : खासदार विनायक राऊत
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) : भूस्खलनामुळे झोळंबे, दाभोळेसह सहा बाधित गावातील कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ. तसेच या गावातील मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण केली जातील. तसेच भूस्खलनाच्या कामासाठी 9.50 कोटीचा प्रस्ताव करण्यात आला आहे. तो शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. तथापि कोरोनाच्या पार्श्वभुमीमुळे हा निधी प्रलंबित आहे. तरी हा निधी लवकरात लवकर देण्याबाबतचे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले.
दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथे भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी तसेच याबाबत केलेल्या उपाययोजना व कामांची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी केली. यावेळी सा.बा. विभाग सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई, सावंतवाडी तहसिलदार राजाराम म्हात्रे, दोडामार्गचे प्रभारी तहसिलदार संजय कर्पे, तालुका कृषि अधिकारी स्नेहा शेटे, जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई, पंचायत समिती सदस्य धनश्री गवस, झोळंबे गावचे सरपंच राजेश गवस, संजय पडते व बबनराव धुरी आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, झोळंबे गावामधील तातडीने गॅबियन वॉल उभारण्यात येईल. या कामाला 3 लाखाचा निधी देण्यात येईल. पावसाळ्याच्या तोंडावर लवकरात लवकर लाईट पोल उभारुन लाईट जोडण्यात यावी. तसेच विस्तारीत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करावे. भूस्खलनामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नारळ, पोफळीची रोपे तातडीने देण्याबाबत सूचना केली. पावसाळ्यात गैरसोय होणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यांना प्राथमिक सोयी सुविधा पुरवाव्यात. तसेच भूस्खलनामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याबाबत संबंधितांना खासदार राऊत यांनी सांगितले.

No comments