Header Ads

Header ADS

प्रदूषण घटले

कोरोना महामारीने मानवाला बंदिस्त करून सर्वच व्यवहार बंद करून, निसर्ग स्वच्छ करून दाखवला. नद्या, नाले, हवा आणि ध्वनी यांचे वाढलेले कमालीचे प्रदूषण कोरोनाच्या लॉकडाऊनरूपी एका झटक्यात कमी झाले. त्यामुळे यंदाचा जागतिक पर्यावरण दिन विशेष आहे. यंदा तो साजरा करताना मानव कोरोनाच्या भीतीने दुःखी-कष्टी असला, तरी निसर्ग जणू मनातून आनंदून गेला आहे.

नद्या, नाले, ओढे, तलाव स्वच्छ झाले पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, मानवाने वैज्ञानिक प्रगती करताना निसर्गाकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत बेसुमार वृक्षतोड केली. परिणामी, जलस्रोत आटले.पाण्याचे दुर्भिक्ष्य झपाट्याने वाढले. मात्र, लॉकडाऊन काळात देश, राज्य आणि गावातील नद्या, नाले, ओढे, तलाव स्वच्छ झाले. कारण कारखाने बंद होते. सांडपाण्याचा वापर कमी झाल्याने मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबादसारख्या मोठ्या औद्योगिक वसाहती असलेल्या मोठ्या शहरांतील वाढलेले जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर घटल्याचा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी), राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि ‘सफार’ या केंद्र सरकारच्या संस्थेसह (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) अमेरिकेच्या ‘नासा’ने दिला आहे. ‘नासा’च्या अहवालात वीस वर्षांत जगात वाढलेले प्रदूषण दोनच महिन्यांत लॉकडाऊनमुळे घटले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘नासा’ने भारत जवळजवळ प्रदूषणमु्नत झाला असल्याचे दर्शविणारे छायाचित्र 4 मे रोजी जाहीर केले आहे. 23 मार्च ते 24 एप्रिल 2020 या काळात देश आणि राज्यातील प्रदूषण कमालीचे घटल्याचे दर्शविणारी वरील आकडेवारी बरेच काही सांगून जाते.

ज्या शहराला दिवसाचे चोवीस तासही आरामनाही, अशी देशाची आर्थिक राजधानी मुंबई लॉकडाऊन काळात ठप्प झाली. लाखो वाहनांचा धूर थांबला. त्यामुळे सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन या जीवघेण्या विषारी वायूंचे प्रमाण 75 ट्नके घटले.

पुणे शहरात आरटीओच्या नोंदणीनुसार, 41 लाख वाहने आहेत. त्यांची वर्दळ थांबताच प्रदूषण कमालीचे घटले. कार्बनचे ऑक्साईड (सॉक्स) आणि नायट्रोजनचे ऑक्साईड (नॉक्स) यांचे प्रमाण 81 ट्नके इतके 60 दिवसांत कमी झाले. पुणेकरांनी 20 वर्षांनी प्रथमच इतकी शुद्ध हवा घेतली. मुळा-मुठा या नद्यांची प्रदूषण चाचणी केली. त्यात या नद्या 70 ट्नके शुद्ध झाल्याचे उघड झाले आहे. पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजनचे प्रमाण 3.1 वरून 4.6 झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

No comments