Header Ads

Header ADS

महापालिका पथकाकडून विनामास्क, सोशल डिस्टन्स व सार्वजनीक ठिकाणी थुंकलेबाबत 187 लोकांवर करवाई करुन 34 हजार 800 रुपये दंड वसूल







कोल्हापूर, दि. 05 :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 187 लोकांकडून 34 हजार 800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल गुरुवार दि.4 मार्च 2021 रोजी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क 164 लोकांनकडून 16400, सोशल डिस्टन्स 9 लोकांनकडून 6000, सार्वजनीक ठिकाणी थुंकलेबाबत 12 लोकांनकडून 2400 तसेच प्लॅस्टिकचा वापर केलेमुळे 1 व्यक्तिंकडून 5000 व बायोमेडीकल उघडयावर टाकलेबददल 1 व्यक्तिंकडून 500 असे एकुन 187 लोकांकडून 34 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील 13 मंगल कार्यालयाची तपासणी करण्यात आली. यावेळी ताराबाई पार्क, कसबा बावडा व बाबूराव नगर येथील मंगल कार्यालयांना 9000/- रुपयांचा दंड करण्यात आला.

शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करुन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

No comments