Header Ads

Header ADS

काम वाटप करण्यासाठी सेवा सहकारी संस्थांनी १५ मार्च पर्यंत प्रस्ताव सादर करावेत - सहायक आयुक्त ज. बा. करीम








सांगली, दि. 5, (जि. मा. का.) : सेवा सहकारी संस्थाना काम वाटप करण्यासाठी कार्यकारी अभियंता

वारणा कालवे विभाग क्र. १, इस्लामपूर (ता. वाळवा) यांच्याकडून काम प्राप्त झाले असून त्यांना 11 महिने

कालावधीसाठी 03 वाहनचालकांची आवश्यकता आहे. वाहनचालकासाठी मानधन 13 हजार 330 रूपये

आहे. तरी अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या कार्यरत सेवा सहकारी संस्थानी इच्छापत्रासह व आवश्यक कागदपत्रासह

प्रस्ताव दि. 15 मार्च 2021 पर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली येथे

सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त

ज. बा. करीम यांनी केले आहे.

वाहन चालक पात्रता पुढीलप्रमाणे आहे – वाहन चालक भारतीय नागरिक असावा. तसेच चौथी

उत्तीर्ण असावा. मराठी लिहता / वाचता बोलता येणे आवश्यकता आहे. वाहन परवाना हेवी लायसन सोबत




ओळखपत्र, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र व पॅन कार्ड यापैकी एक असावे. वय 18 वर्षे पूर्ण असावे व 58

वर्षापेक्षा जास्त नसावे.

अटी व शर्ती पुढीलप्रमाणे – बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही

ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. बेरोजगारांची

सहकारी सेवा सोसायटी त्यांना देण्यात येणारे काम करण्यासाठी पात्र असावी. सहकारी सेवा सोसायटीस 3

लाख रूपये पर्यंतची कामे मिळण्यासाठी त्यांनी यापूर्वी केलेल्या कामाचे अनुभव दाखले प्रस्तावासोबत जोडणे

आवश्यक आहे. सहकारी सेवा सोसायटी खाते सहकारी बँक / राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सहकारी सेवा

सोसायटीच्या आर्थिक उलाढालीचे नियमीत वार्षिक लेखापरिक्षण केलेले असावे. सन 2019-20 चे

लेखापरिक्षण अहवालाची प्रत सोबत जोडावी. सहकारी सेवा सोसायटी / लोकसेवा केंद्र यांनी सदस्यांना

ओळखपत्रे देणे आवश्यक असून ते क्रियाशील सदस्य असणे आवश्यक आहे. जे सदस्य क्रियाशिल नसतील त्यांची

नावे सदर सहकारी सेवा सोसायटीतून कमी करून त्या ठिकाणी नवीन सदस्य घेण्यात यावेत. कागदपत्रांच्या

छायांकित प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. सदरचे काम हे इस्लामपूर येथील

असल्यामुळे ज्यांचे कार्यक्षेत्र इस्लामपूर आहे तसेच जिल्हास्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या संस्थानी अर्ज सादर

करावेत. अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची छायांकित प्रत जोडावी. संस्था

अवसायानात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येवू नये, असे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे

कळविले आहे.

No comments