कोल्हापूर महानगरपालिका सन 2020-21 चे सुधारीत व सन 2021-22 चे नवीन अंदाजपत्रक

कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2020-21 चे सुधारीत व सन 2021-22 चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदींनुसार सादर करण्यात येत आहे. कोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत नोव्हेंबर 2020 मध्ये संपलेने प्रशासक,कोमनपा या नात्याने आपले बजेट 2021-22 या संकल्पनेवरील अंदाजपत्रक नागरिकांसाठी सादर करण्यात येत आहे.
सन 2021-22 चे आपले बजेट तयार करताना शहरातील नागरिकांकडून थेट अपेक्षा, सुचना जाहिर प्रसिध्दीकरण करुन मागविण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना, व्यक्ती, व्यापारी संघटना यांचेशी थेट चर्चा करण्यात आली. विविध पक्षांच्या प्रतिनिधी यांनीही आपल्या अपेक्षा कळविल्या आहेत. तसेच विविध प्रसिध्दी माध्यमांनीही आगामी बजेटमधून नागरिकांच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्याचाही विचार सदर बजेट तयार करताना करण्यात आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेचे सन 2021-22 चे अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षित जमा रक्कम रुपये 623.48 कोटी असून खर्च रुपये 621.96 कोटी अपेक्षित आहे. तसेच विशेष प्रकल्पा अंतर्गत सुरु असले कामांचे जमा खर्चाचे स्वतंत्र अंदाज सोबत सादर केले असून त्यामध्ये जमा रुपये 396.49 कोटी अपेक्षित असून खर्च रुपये 390.47 कोटी अपेक्षित आहे. महिला व बालकल्याण निधी व केंद्रीय वित्त आयोगाचे एकत्रित स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आले आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण जमा रु. 65.51 कोटी अपेक्षित असून खर्च रु. 64.17 कोटी अपेक्षित आहे.
याप्रमाणे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण रु. 1085.48 कोटी इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंदाजसादर करण्यात येत आहे. नागरिकांच्या अपेक्षांचा विचार करुन जास्तीत जास्त उपयुक्त योजनांचा समावेश आपले बजेट 2021 मध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तसेच नविन आर्थिक वर्षामध्ये नाविन्यपूर्ण योजना राबविणेत येत आहेत.
सन 2021-22 चे अर्थसंकल्पामधील ठळक प्रकल्प -
· महिलांसाठी स्वतंत्र º´ÉSUôiÉÉMÉÞ½þä -
शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी महिलांचा वावर मोठया प्रमाणावर असतो, तसेच मोठया प्रमाणावर महिला पर्यटक/भाविक शहरास भेट देत असतात. सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांसाठी सर्व सोयींयुक्त स्वच्छतागृहांची पुरेशी संख्या उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छ व पुरेशा सुविधांसह नव्याने स्वच्छतागृहे बांधणेबाबत प्रस्तावीत आहे. यासाठी सन 2021-22 च्या अंदाजपत्रकामध्ये रु.1 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.
· हेरीटेज वास्तु संवर्धन/हेरिटेज वॉक,पर्यटन स्थळे -
कोल्हापूर शहराला मोठया प्रमाणावर एैतिहासिक वास्तुंचा वारसा लाभला आहे. शहरास मोठया प्रमाणावर पयर्टक/भाविक भेट देत असतात. शहरातील हेरिटेज वास्तुंचे संरक्षण, संवर्धन होणेसाठी सन 2021-22 चे अंदाजपत्रकामध्ये रु. 1 कोटी तरतूद करण्यात आली आहे. तसेच शहरामध्ये हेरिटेज वॉक सुरु करण्यात येणार असून एैतिहासिक वास्तुंना जास्तीत जास्त नागरिक/पर्यटक भेट देतील यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
· सेंट्रल पब्लिक अनाऊसिंग सिस्टिम –
कोल्हापूर महानगरपालिका एरियामध्ये सेंट्रल पब्लिक अनाऊसिंग सिस्टिम बसवणेत येणार आहे. सेंट्रल पब्लिक अनाऊसिंग सिस्टिम म्हणजे आपण सेंट्रल कंट्रोलिंगच्या ठिकाणाहून नागरिकांना आवश्यक सुचना किंवा संदेश या यंत्रणेद्वारे शहरातील विविध ठिकाणी देता येतात. ही यंत्रणा शहरातील विविध ठिकाणे / मुख्य चौकामध्ये बसविणेत येणार आहे. तसेच कंट्रोल रुममधून बसून संपूर्ण शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून त्यांना संदेश देणारी यंत्रणा शहरात कार्यन्वित होणार आहे.
· उद्यानांचा विकास, सेंसरी गार्डन, हरित पट्टे/वने विकसीत करणे -
अंदाजपत्रकीय वर्षामध्ये महानगरपालिका विविध उद्यानांचा विकास करणेबाबत प्रस्तावीत आहे. यामध्ये प्रामुख्याने महावीर उद्यान व हुतात्मा उद्यान येथे सुशोभिकरण, सोलर दिवे, प्लँटेशन, वॉकींग ट्रॅक यांचा समावेश करणेत आला आहे. तसेच महावीर उद्यान येथे सेंसरी गार्डन विकसीत करणेत येत आहे. उद्यान विकासासाठी अंदाजपत्रकामध्ये रु.50 लाख तरतूद करण्यात आली आहे.
तसेच शहरामध्ये अमृत योजना उद्यानांच्या मार्गदर्शक सुचनांनुसार हरित पट्टे/वने विकसीत करणेत येत आहेत. वित्त आयोगाचे माध्यमातून यासाठी रु.4.70 कोटी निधी आरक्षीत करणेत आला आहे.
· सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज –
केंद्र शासनाचे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडून सर्व महानगरपालिकेमधील ड्रेनेज लाईन, सिवर लाईन व सेप्टीक टँक सफाई कर्मचारी यांच्या सुरक्षा व उन्नतीसाठी सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2021 हे अभियान राबविणेत येत आहे. सफाई कर्मचारी यांना सुरक्षा साहित्य, मशिनरीज्, इक्वीपमेंटस् उपलब्ध करणेत येत आहेत. यासाठी अंदाजपत्रकामध्ये रु.30 लाख तरतूद करण्यात आली आहे.
· आय.टी.पार्क विकसीत करणे -
शहराचे सर्वांगिन विकास व रोजगार निर्मितीसाठी आय.टी.पार्क असणे आवश्यक आहे. यासाठी मनपाच्या टेंबालाईवाडी येथील आरक्षीत जागेवर पीपीपी माध्यमातून आयटी पार्क विकसीत करणेबाबत प्रस्तावीत आहे. यासाठी आवश्यक फिजीबीलीटी रिपोर्ट व अनुषंगिक काम पूर्ण करणेत आले आहे. अंदाजपत्रकीय वर्षामध्ये निविदा प्रक्रीया राबवून आयटी पार्क विकसीत करणेबाबत प्रस्तावीत आहे. याकामी अनुषंगिक कामासाठी रु.1 कोटी तरतूद करण्यात आली आहे.
· लिकेज डिटेक्श्न प्रोग्रॅम -
शहर पाणी पुरवठा योजना वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करणेसाठी व पाणी लिकेजीस् कमी करणेसाठी स्वतंत्र लिकेज डिटेक्शन प्रोग्रॅम राबविणेबाबत प्रस्तावीत आहे. लिकेजीस् कमी केल्याने पिण्याचे पाणी पुरेशा दाबाने पुरविता येणे शक्य आहे, तसेच पाणी बिलींग वाढणे, वेस्ट वॉटर कमी करणे इ.साठी मदत होणार आहे. यासाठी अंदाजपत्रकामध्ये रु.25 लाख तरतूद करण्यात आली आहे.
· कोटीतिर्थ तलाव पूर्नजीवीकरण -
कोटीतिर्थ तलाव हा शहरातील प्रमुख तलावांपैकी एक आहे. तलावाचे प्रदुषण कमी करणे, संवर्धन करणेसाठी प्रकल्प तयार करणेत येत आहे. कोर्टीतिर्थ तलावाचे पुर्नजीवीकरण करणेसाठी वित्त आयोग निधीमधून नियोजन करण्यात आले आहे. तलावाचे पुर्नजीवीकरण, संवर्धनामुळे जैवविविधेस चालना होणार आहे व चांगले पर्यटन स्थळही विकसीत होणार आहे. यासाठी सन 2021-22 चे अंदाजपत्रकामध्ये रु.3.50 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
· अग्निशमन यंत्रणा- मनपा हॉस्पीटल, प्रशासकिय इमारती -
महानगरपालिका विविध हॉस्पीटल्स् येथे उपचारासाठी व प्रशासकीय इमारतींमध्ये नागरिक मोठया प्रमाणावर येत असतात. सुरक्षेच्या अनुषंगाने आग प्रतिबंधक उपाययोजनेसाठी अद्ययावत अग्निशमन यंत्रणा सर्व हॉस्पीटल्स् व मनपा इमारती येथे बसविणेबाबत प्रस्तावीत आहे. अंदाजपत्रकामध्ये रु. 40 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे.
· ट्रॅफिक सिग्नल सिंक्रोनायझेशन ट्रॅफिक मॅनेजमेंट/पट्र्टे मारणे –
शहरातील वाढती रहदारी, वाहनांची संख्या व ट्रॅफिक यांचा विचार करुन ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसविणेत आली आहे. आता यामध्ये सिग्नल सिंक्रोनायझेशन
No comments