Header Ads

Header ADS

के.एम.टी. उपक्रमाचा सन 2021-2022 चा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा सादर







के.एम.टी. उपक्रमाचा सन 2020-2021 चा सुधारीत व सन 2021-2022 चा जमा खर्चाचा महसूली रु.1,28,100/- शिल्लकीचा नवीन अंदाजपत्रकीय आराखडा प्रशासकीय समितीकडे मान्यतेस्तव सादर केला. नवीन अंदाजपत्रकीय आराखड्यामध्ये अव्वल शिल्लकेसह महसूली जमा रु.71,19,80,100/- आणि महसूली खर्च रु.71,18,52,000/- असा रु.1,28,100/- चा शिल्लकी अंदाज, तर अव्वल शिल्लकेसह भांडवली जमा रु.10,25,75,000/- व भांडवली खर्च रु.9,87,75,000/- असा आहे. नवीन अंदाजपत्रकीय आराखडयामध्ये महापालिकेकडून महसुली खर्चासाठी अर्थसहाय्य रु.14.00 कोटी व भांडवली खर्चासाठी रु.50 लाख अशी एकूण रु.14.50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

सन 2021-2022 चे नवीन अंदाजपत्रकामध्ये के.एम.टी. बस ताफ्यातील 129 बसेसपैकी 100 बसेस दैनंदिन मार्गस्थ करणेचे नियोजन असून सदर 100 बसेस पासून प्रवासी तिकीट विक्रीतून मिळालेले उत्पन्न व पे ॲण्ड पार्किंग, बसवरील जाहिरात इत्यादी मार्गाने येणारे उत्पन्न महसूली जमेस धरणेत आले आहे. यामध्ये जमेचा व खर्चाचा रुपया खालीलप्रमाणे आहे.

नवीन आर्थिक वर्षामध्ये बसेसमध्ये एलईडी टिव्हीद्वारे मनोरंजन व प्रबोधनात्मक कार्यक्रम प्रसारण करुन प्रिमियम प्राप्त करणे, महाऊर्जाचे माध्यमातून सौरऊर्जा प्रकल्प, मनपा अर्थसहाय्यातून MIDC येथील जागा विकसीत करणे, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिवयांग, अंध, मतीमंद, मुकबधीर, स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी इ. घटकांना तिकीटामध्ये देणेत येणाऱ्या सवलतीपोटी परतावा / अनुदान प्राप्त करणे, आमदार-खासदार निधी मधून किमान दोन व महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून दोन अशा एकूण चार नविन मिनी बसेस महिला व विद्यार्थ्यांसाठी खरेदी करणे, ITMS अंतर्गत ई-तिकीटींग व पास वितरण यंत्रणा अद्ययावत करणे, अलोकेशन सॉफ्टवेअर तयार करणे, आरक्षित जागा के.एम.टी.चे ताब्यात आल्यानंतर व्यापारी दृष्टीकोनातून विकसीत करणे, के.एम.टी./के.एम.सी. स्ववापर व व्यावसायिक वापरासाठी CNG / फ्युएल पंप बसविणे, ऊर्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्पांतर्गत जुनी इलेक्ट्रिक उपकरणे बदलून नवीन उपकरणे बसविणे, त्याचबरोबर 2016 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व इतर थकीत देणी देण्यासाठी इ. महत्वपूर्ण बाबींसाठी आवश्यक तरतूद करण्यात आली आहे.


00000000000















कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रम

- अंदाजपत्रकातील उद्दिष्ट्ये -



सन 2021-22 करिता नाविन्यपूर्ण योजना

के.एम.टी./के.एम.सी. वाहनांसाठी के.एम.टी.च्या जागेत सीएनजी पंप उभा करणे. (रु.50.00 लाख)

सध्याचे ई-तिकीटींग व आरएफआयडी पासेस सिस्टीम अद्ययावत करणे, मोबाईल ॲपद्वारे डिजीटल तिकीट/पासेस/पेमेंट सुविधा, जीपीएस, व्हीटीएस, पीआयएस सिस्टीम करणे. प्लॅनिंग अँड शेडयुलींग सॉप्टवेअर इ.साठी आयटीएमएस प्रकल्प राबविणे. (रु.75.00 लाख)

फक्त महिला व विद्यार्थ्यांसाठी नवीन मिनी सीएनजी बसेस आमदार स्थानिक विकास निधी व कोल्हापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या अनुदानातून खरेदी करणे. (रु.1 कोटी)

मुख्य यंत्रशाळा येथे अनुदानातून महाऊर्जामार्फत सौर उर्जा प्रकल्प राबविणे. (रु.15.00 लाख)

मेडा मार्फत प्राप्त अनुदानातून उर्जा संवर्धन प्रकल्प राबविणे. (रु.9.00 लाख)

बसेसमध्ये एलईडी टिव्ही व एफएम सुविधेद्वारे प्रवाशी मनोरंजन व प्रिमीयमद्वारे उत्पन्न प्राप्त करणे. (रु.12.00 लाख)

हॉटेल महासंघ व के.एम.टी. यांचे संयुक्त विद्यमाने जोतीबा/पन्हाळा सेवा कोल्हापूर दर्शन व विमानतळ येथे आधुनिक बसद्वारे सेवा सुरु करणे.

व्हिनस कॉर्नर गाडी अड्डा (पे ॲण्ड पार्किंग) पासून श्री अंबाबाई मंदीर येथे पर्यटकांसाठी शटल सर्व्हीस बस सेवा सुरु करणे.

-0-0-0-0-


No comments