Header Ads

Header ADS

महापालिका पथकाकडून विनामास्क, सोशल डिस्टन्स व सार्वजनीक ठिकाणी थुंकलेबाबत 91 लोकांवर करवाई करुन 12 हजार 500 रुपये दंड वसूल








कोल्हापूर, दि. 02 :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून 91 लोकांकडून 12 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरने, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल रविवार दि.28 फेब्रुवारी 2021 रोजी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क 78 लोकांनकडून 7800, सोशल डिस्टन्स 7 लोकांनकडून 3500 व सार्वजनीक ठिकाणी थुंकलेबाबत 6 लोकांनकडून 1200 असे एकुन 91 लोकांकडून 12 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

शहरामध्ये गर्दी वाढत असलेने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सन, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करुन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

000000

No comments