शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणाकरीता डास-अळी सर्व्हेक्षण
कोल्हापूर ता.02 : महापालिकेच्यावतीने आज आरोग्य किटकनाशक विभागामार्फत शहरात डेंग्यु, चिकुनगुनिया साथरोग नियंत्रणा करीता डास-अळींचे सर्व्हेक्षण करण्यात आले. एकूण 6659 घरे तपासण्यात आली. या घंरामध्ये वापरासाठी साठविण्यात येणारे 9763 कंटेनर तपासले. यामध्ये दुषित 181 ठिकाणी डास-अळी आढळल्या. दुषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकणेत आले आहे.
महापालिकेच्यावतीने खाजगी एजन्सी मार्फत 25 बिडिंग चेकर्स् नेमणेत आले आहेत. आरोग्य निरिक्षक, मुकादम, डासअळी सर्व्हेक्षण कर्मचारी यांचे सोबत या बिडींग चेकर्सनी मंडलीग गल्ली, शिंगोशी मार्केट, कोष्टी गल्ली, तस्ते गल्ली, महादेव मंदिर, पी.टी.एम. तालीम, कैलासगड स्वारी मंदिर, देवणे गल्ली, तोडकर मंडप, कोष्टी गल्ली नं.2, गणेश कॉलनी, सासने कॉलनी, रायगड कॉलनी, जासुद गल्ली, कन्नुर गल्ली, सुबराव गवळी तालीम, सणगर गल्ली, बिंदु चौक, गुलाब गल्ली, हैदर रोड, शिंद्र गल्ली, कॅसेट गल्ली, पोवार गल्ली, बामणे गल्ली, केळीची गल्ली, देवणे गल्ली, अ आणि ब संपूर्ण परिसर इत्यादी ठिकाणी डास-अळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
तरी आरोग्य विभागाकडून शहरातील नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया ची लक्षणे आढळलेस को.म.न.पा. आरोग्य विभाग व शासकीय रुग्णालयाशी त्वरीत संपर्क साधावा. सेप्टिक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविणेत यावी. आठवडयामध्ये साठणा-या पाण्याचे पिंप/भांडी एकाच ठिकाणी भरुन एक दिवस कोरडा दिवस पाळणेत यावा. फ्रिजमधील डिफ्रॉस ट्रे मधील पाणी आठ दिवसातून एकदा रिकामे करणेत यावे. घराजवळील परिसरामध्ये रिकामे टायर्स्, नारळाच्या करवंटया, डबे इत्यादीमध्ये पाणी साठू न देणे. घरामध्ये लांब बाहयांचे व संपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावे. डास प्रतिबंधक कॉईल तथा क्रिम वापरावे असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
No comments