जिल्हा क्षयरोग केंद्र ग्रामीणला सिल्वर पदक प्राप्त -जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ऊषा कुंभार
कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे धोरण निश्चित केले आहे. जिल्हा पातळीवरुन टीबी दूरीकरणासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा क्षयरोग केंद्र, ग्रामीणला सिल्वर पदक मिळाले असून याचा वितरण सोहळा उद्या दिल्ली येथे होणार असल्याची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ऊषा कुंभार यांनी दिली.
आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या उपक्रमातंर्गत सबनेशनल सर्टीफीकेशन पुरस्कारासाठी अर्ज मागविलेले होते केंद्रिय क्षयरोग विभाग यांच्या मार्गदशक सूचनानुसार कोल्हापुर ग्रामीणचे विविध निकषची पडताळणी करिता ब्रॉंझ सबनेशनल सर्टीफीकेशन-2020 करिता नामांकन झाले होते. केंद्रिय क्षयरोग विभाग व राज्य स्तरीय विभाग आणि विविध शासकीय 5 संस्थाद्वारे निवडलेल्या गावांचे सर्वेक्षण, 2015 ते 2020 पर्यंतची रुग्ण माहिती, व पडताळणी,खाजगी टी.बी. विरोधी औषधे विक्री पडताळणी, शासकिय टी.बी. विरोधी औषधे वितरण पडताळणी, तसेच विविध मार्गदशक सूचनानुसार निकषांची पडताळणी केल्यावर 2015 च्या बेसलाईन नुसार 40 टक्के रुग्ण संख्येत घट दिसून आल्यामुळे जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापुर ग्रामीणला सिल्वर मेडल सर्टीफीकेशन जाहीर करण्यात आले आहे. सिल्वर मेडल साठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी . कुंभार यांनी विशेष प्रयत्न केले.
या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळी यांचे सहकार्य लाभले. तसेच सर्व टी.बी सुपरवायझर, एल.टी.तसेच सर्व तालुकास्तरीय व आरोग्य वार्धिनी ग्रामीण रुग्णालय स्तरावरील अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
ब्रॉंझ सबनेशनल सर्टीफीकेशनसाठी देशातुन एकूण 72 जिल्हे नामांकित झालेली होती. महाराष्ट्रातून 11 जिल्हे नामांकित झाले होते. त्यापैकी कोल्हापूर ग्रामीणचे ब्रॉंझ सबनेशनल सर्टीफीकेशनसाठी नामांकन झालेले होते, तरी केंद्रीय पथकाने पुर्ण पडताळणी करून कोल्हापुर ग्रामीणसाठी सिल्वर मेडल सबनेशनल सर्टीफीकेशन जाहीर केले आहे. याच्या पडताळणीकरिता सर्व्हेसाठी कोल्हापूर ग्रामीण मध्ये 12 टीयु अंतर्गत 15 टीम तयार करण्यात आल्या होत्या. या टीम अंतर्गत केंद्रीय स्तरावरून निवडून देणेत आलेल्या 20 गावांमध्ये 15 टीमव्दारे सर्व्हे करण्यात आला. 1) ठमकेवाडी 2) लखमापूर 3) गवशी 4) वन्नूर 5) हालोली 6) कुंभलहल 7) कुर्तनवाडी8) सातवे 9) वडगाव कसबा (एम.एल.) वार्ड क्रमांक -0016 10) कोरोची (सीटी) वार्ड नंबर -1000111 ) इचलकरंजी (एम.एल.) वार्ड क्रमांक -007 12) टाकवडे 13) जयसिंगपूर (एमएल सीएल) वार्ड क्रमांक -002214) विकासवाडी 15) आरळे वरील गावात या सबनेशनल सर्टीफीकेशन अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आला, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी . कुंभार यांनी दिली.

No comments