प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर सन 2020 - 2021 चे सुधारीत व सन 2021 - 2022 चे नवीन अंदाजपत्रक
प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर
सन 2020 - 2021 चे सुधारीत व सन 2021 - 2022 चे नवीन अंदाजपत्रक
प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरचे सन 2020-21 चे सुधारीत व सन 2021-2022 चे नवीन अर्थसंकल्पीय अंदाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 63 नुसार सादर करणेत येत आहे.
प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूर मार्फत कोल्हापूर शहरामध्ये एकूण 58 म.न.पा प्राथमिक शाळा सुरु असून 17 शाळांमधून सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरु आहेत. मनपा शाळांसाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरच्या मालकीच्या 58 शालेय इमारती उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून सध्या मनपा प्राथमिक शाळांमध्ये 10312 विदयार्थी शिक्षण घेत आहेत. सन 2019/20 मध्ये शिक्षण समितीकडील मनपा शाळांतील गरजू विद्यार्थ्यांकरिता शालेय गणवेश, सेमी इंग्रजी तसेच मराठी/उर्दू माध्यमांचे शाळांसाठी आवश्यकते नुसार शैक्षणिक साहित्य, मॉडेल स्कूलसाठी संगणक, इत्यादी सोयी सुविधा पुरविणेत आलेल्या आहेत त्याच बरोबर व्यक्तिमत्व विकास शिबीर, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, कोल्हापूर प्रज्ञा शोध परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा, शिक्षकांकरिता आवश्यक प्रशिक्षण, इत्यादी उपक्रम राबविणेत आलेने मनपा शाळांचे शिक्षणाचे दर्जामध्ये सुधारणा झालेली असून विशेषत: से.मी इंग्रजी शाळांमध्ये तसेच शाळेतील विद्यार्थ्याचेही गुणवत्तेमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सेमी इंग्रजी मनपा प्राथमिक शाळांमध्ये आपले पाल्यास प्रवेश मिळणेसाठी सर्व सामान्य वर्गाबरोबरच उच्चभ्रू वर्गातील पालकही इच्छूक दिसत आहेत. सद्यस्थितीत कोरोणा प्रादुर्भावामुळे इ. 1 ली ते 4 थी चे वर्ग बंद आहेत.
सन 2021 - 2022 चे अर्थसंकल्पीय अंदाजामधील ठळक बाबी पुढील प्रमाणे :-
प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरकरिता सन 2021 - 2022 साठी शासनाकडे प्रस्तावित तरतूद 21,04,21,956/- व म.न.पा.कडे प्रस्तावित तरतूद 37,00,00,000/- चे एकत्रित नवीन अंदाजपत्रक अव्वल शिलकेसह रक्कम रुपये 58,04,21,956/- चे सादर करणेत येत असून त्यातील विशेष उल्लेखनीय बाबी पुढील प्रमाणे आहेत.
· से.मी इंग्रजी शाळा :- सध्या 17 मनपा प्राथमिक शाळां से.मी इंग्रजी मध्ये सुरु असून जून, 2021 मध्ये नवीन पाच सेमी इंग्रजी मनपा प्राथमिक शाळा सुरु करणेचा मानस आहे. त्यानुसार आवश्यक अर्हताप्राप्त शिक्षक वर्ग तसेच आवश्यक शैक्षणिक साधने, सुविधां उपलब्ध करणेचा मानस आहे.
· शैक्षणिक सुविधा :- मनपा शाळांसाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरच्या स्वमालकीच्या 58 इमारती उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून या शाळांमध्ये विद्यार्थ्याना स्वच्छ पिण्याचे पाणी, फर्निचर साहित्य, शैक्षणिक तक्ते, सायन्स साहित्य, स्वच्छतागृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
· ई लर्निग सुविधा :- सध्या 54 मनपा प्राथमिक शाळांमध्ये ई लर्निग सुविधा उपलब्ध असून सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये उर्वरित सर्व मनपा शाळांना सी.एस.आर.फंडातून ई लर्निग सुविधा (ऍ़न्ड्राईड टिव्ही/प्रोजेक्टर) पुरविणेचा मानस आहे.
· संगणक :- 58 मनपा प्राथमिक शाळांसाठी यापूर्वी संगणक सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून या शैक्षणिक वर्षामध्ये आणखीन 25 संगणक पुरविणेचा मानस असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित करणेत आलेली आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व सी.एस.आर.फंडातून उपलब्ध करणेचा मानस आहे.
· शिष्यवृत्ती सराव परीक्षा :- मनपा शाळांतील विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बहुसंख्येने यश संपादन करावेत यासाठी शालेय सराव परींक्षांचे आयोजन करणेत येणार असून येत्या शैक्षणिक वर्षातील इ. 5 वी चे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मनपा शाळांतील बहुसंख्य विद्यार्थी निश्चितच यश संपादन करतील अशी आशा आहे.
· कोल्हापूर प्रज्ञा शोध परीक्षा :- इयत्ता 1 ली ते 4 थी तील मराठी, ऊर्दू व सेमी इंग्रजी वर्गातील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आकलन शक्तीचा विकास होण्याच्या दृष्टीने शिक्षण समिती मार्फत गेली दोन वर्ष हा स्तुत्य उपक्रम राबविणेत येत असून या परीक्षेमूळे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक विकास होत असलेने दिवसेंदिवस शालेय पटसंख्या वाढीमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येत आहे.
· विज्ञान प्रदर्शन :- कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणेत येणार आहे. त्यामुळे मनपा शाळांतील विद्यार्थ्याचा विज्ञान प्रकल्प राज्य/राष्ट्रीय स्तरावर निश्चितच सहभागी होऊ शकेल.
· क्रीडा स्पर्धा :- मनपा जिल्हास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा तसेच मनपा शाळा आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणेत आलेले असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये करणेत आलेली असलेने मनपा शाळांतील विद्यार्थ्यी निश्चितच शहर/जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावर क्रीडा विभागामध्ये उज्वल यश संपादन करील अशी आशा आहे.
· सांस्कृतिक कार्यक्रम :- शहरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव मिळावा व त्यातूनच भविष्यात कलाकार निर्माण होणेसाठी मदत व्हावी यासाठी प्रतिवर्षी प्रमाणे 26 जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत येणार आहे.
· सी.एस.आर.फंड :- प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका, कोल्हापूरकडे नवीन सी.एस.आर.फंड खाते सुरु करून जास्तीत जास्त
...
No comments