शहरात आज 103 नागरीकांचे लसीकरण
कोल्हापूर ता.28 : शहरामध्ये आज 6 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये मिळूण एकूण 103 नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे 10, फिरंगाई येथे 30, राजारामपूरी येथे 17, कसबा बावडा येथे 7, सदरबाजार येथे 21 व सिध्दार्थनगर येथे 18 इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 1,14,208 इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर 40,664 इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
दिनांक 29 मे 2021 रोजी 45 वर्षावरील कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांनी कोव्हिशिल्डच्या दुस-या डोस घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे. याकरीता पात्र लाभार्थींना संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन कोव्हिशिल्डच्या दुस-या डोससाठी फोन येईल त्यांनीच व 84 दिवस पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांनीच संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे.
No comments