कोल्हापूरात आज 299 नागरीकांचे लसीकरण
कोल्हापूर ता.27 : शहरामध्ये आज 3 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पीटलमध्ये मिळूण एकूण 299 नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे 33, फिरंगाई येथे 7, सदरबाजार येथे 250 व सीपीआर हॉस्पीटल येथे 9 इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 1,14,193 इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर 40,576 इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
दिनांक 28 मे 2021 रोजी 45 वर्षावरील कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांनी कोव्हिशिल्डच्या दुस-या डोस घेण्यासाठी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे. याकरीता पात्र लाभार्थींना संबंधीत प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन कोव्हिशिल्डच्या दुस-या डोससाठी फोन येईल त्यांनीच व 84 दिवस पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांनीच संबंधीत लसीकरण केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे.
No comments