सोशल डिस्टन्स न पाळलेणे महापालिकेजवळील 6 दुकानधारकाकडून दंड वसूल
कोल्हापूर, दि. 03 :- महानगरपालिका परीसरातील दुकानदरांनी सकाळी सोशल डिस्टन्स न पाळलेणे 6 दुकानदारकांकडून रक्कम रु.6000/- दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्स न पाळणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल महानगरपालिकेच्या भरारी पथकाकडून सहा दुकान धारकांवर प्रतेकी एक हजार रुपये दंड करण्यात आला. यामध्ये घनशाम दास कांतीलाल, आदित्य हर्बल, बावडेकर, विठ्ठल वेंगुर्लेकर, राज एन्टरप्रायजेस,मणेर पेन्ट यांच्याकडून प्रत्येकी रु.1000/- प्रमाणे रु.6000/- दंड वसुल करण्यात आला.
No comments