सनमडी येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्तेम्हैसाळ कालव्याचे पाणीपूजन
सांगली : जत तालुक्यातील सनमडी येथे म्हैसाळ कालव्याचे पाणीपूजन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे सुमारे 7 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून चाचणी घेवून पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिल्या. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी सनमडी ते मंगळवेढा तालुक्याच्या सीमेपर्यंत असणाऱ्या म्हैशाळ कालव्याची पाहणी केली.
पाणीपूजन प्रसंगी अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, सहाय्यक कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, उपविभागीय अधिकारी सी. एस. मिरजकर, उपविभागीय अभियंता बाबासो पाटील, सहाय्यक अभियंता मनोज कर्नाळे व गणेश खरमाटे, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू मासाळ, सुभाष देवकाते, रवि सुर्यवंशी, महेश मासाळ आदि उपस्थित होते.
000000
No comments