Header Ads

Header ADS

प्रशासनाला न जुमानता नागरिकांची लुट करणाऱ्या डॉ.कौस्तुभ वाईकरवर तात्काळ कारवाई करा


*डॉ.कौस्तुभ वाईकरला पाठीशी घालून किती नागरिकांचे बळी घेणार..??? असा सवाल आज महानगरपालिका प्रशासनाला केला.

*तक्रारींची निपक्षपातीपणे चौकशी करून दोषी आढळलयास डॉ.कौस्तुभ वाईकर यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार : आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे*

*सिद्धांत हॉस्पिटल येथील कोव्हीड सेंटर बंद करण्याच्या महापालिका प्रशासनाचे आदेश : उप-आयुक्त निखील मोरे*

 एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात कोरोना रोगाने थैमान घातले असताना, अनेक डॉक्टर्स, नर्सेस देवदूताप्रमाणे सेवा देत आहेत. परंतु, डॉ.कौस्तुभ वाईक आणि डॉ.अनुष्का वाईकर यांच्या सारख्या एक – दोन टक्के डॉक्टरांमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदनाम होत आहे. सुमारे १० ते १२ तक्रारी असताना महापालिका प्रशासनाकडून कारवाई होत नाही. हा एकप्रकारे डॉक्टर कौस्तुभ वाईकरला पाठीशी घालण्याचा प्रयत्न असून, अजून किती नागरिकांचे बळी घेणार असा सवाल करीत रुग्णांची लुट करून आरोग्य यंत्रणा बदनाम करण्याचा प्रयत्न पुढील काळात खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा  दिला. 
रिंग रोड येथील सिद्धांत हॉस्पिटल संदर्भात तक्रारदार आणि महापालिका प्रशासन यांची बैठक पार पडली.

    बैठकीच्या सुरवातीस सिद्धांत हॉस्पिटलबाबतच्या सर्व तक्रारी आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

यावेळी बोलताना  कोरोना महामारीच्या काळामध्ये राज्य शासनाच्या निर्देशाने समस्त आरोग्य यंत्रणा देवदूताप्रमाणे काम करत आहे. त्यांच्या कार्याचे नक्कीच कौतुक केले पाहिजे पण, कोल्हापूर शहरातील डॉ.कौस्तुभ वाईकर आणि सौ.अनुष्का वाईकर यांच्या सिद्धांत  हॉस्पिटलकडून रुग्णांची आर्थिक फसवणूक, चुकीचे उपचार केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. डॉ.वाईकर यांच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. डॉ.कौस्तुभ वाईकर यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त असून, यापूर्वी त्यांच्यावर अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. कोव्हीड काळात शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून या रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून लाखोंची बिले वसूल करून लुट केली जात आहे. तक्रार देवूनही महापालिका अधिकारी कारवाई करत नाहीत.  

वास्तविक पाहता डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्याकडे न्युरोसर्जन ही पदवी नसताना त्यांनी न्युरोसर्जरी करून अनेक रुग्णांचे नाहक बळी घेतले आहेत. गत वर्षीच्या आणि यावर्षीच्या कोव्हीड काळातही त्यांच्यावर आर्थिक लुबाडणूक केल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्या पूर्वीच्या प्राईम हॉस्पिटल, बेलबाग, कोल्हापूर या रुग्णालयातही अनेक रुग्णांचा नाहक बळी गेला आहे. या जुन्या प्राईम हॉस्पिटल रुग्णालयाचा सुमारे रु.५० लाख इतका घरफाळा थकीत आहे. असे असताना नवीन सिद्धांत हॉस्पिटल, रिंगरोड या इमारतीस परवानगी देण्यात आली. नवीन सिद्धांत हॉस्पिटल मध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. दुसऱ्या मजल्यापर्यंत इमारतीस परवानगी असताना चार माजली इमारत उभी केली गेली. याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली. अशा वादग्रस्त डॉक्टरमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदनाम होत आहे. डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्या विरोधात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे देखील तक्रारी दाखल झाल्या असून, त्यावर कामकाज सुरु आहे. परंतु, त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रशासनाकडून सदर डॉक्टरला पाठीशी घालण्याचे काम होत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे गत वर्षी पासून सुरु असलेल्या कोरोना काळात सदर रुग्णालयात किती रुग्णांचे मृत्यू झाले याची नोंद महानगरपालिका प्रशासनाकडे नाही. प्रशासनाला न जुमानता काम करणाऱ्या डॉक्टर वाईकर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशा सक्त सूचना महापालिका प्रशासनास दिल्या.

            यावेळी तक्रारदारांनी कशा पद्धतीने रुग्णांची आणि नातेवाईकांची लुट केली जाते. रेमिडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली रुग्णांची लुट केली जाते, मुदत संपलेली औषधे रुग्णास दिली जातात, दिलेली औषधे आणि बिलात लावलेली औषधे यात ताळमेळ नाही. चुकीची बिले देणे, रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धट वर्तन करणे, लाखोंचे पूर्ण बिल भरल्याशिवाय  मृतदेह ताब्यात दिला जात नाही. डिसचार्ज वेळी पण बिलासाठी मानसिक त्रास दिला जातो, अशा अशा अनेक तक्रारींचा पाढा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या समोर वाचला.

            यावेळी बोलतना उप- आयुक्त निखील मोरे यांनी, शासनाने दिलेल्या अॅपवर रुग्णालयांनी कोव्हीड रुग्णांची सर्व माहिती भरणे आवश्यक असल्याचे सांगितले. पण, सिद्धांत हॉस्पिटल कडून अशी कोणतीच माहिती प्रशासनास सादर केलेली नाही त्यामुळे त्यांना नोटीस देण्यात आली पण, त्यावर त्यांनी कोणतेच उत्तर न दिल्याने त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला असून, या रुग्णालयातील कोव्हीड वॉर्ड तातडीने बंद करण्याचा आदेश महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे. त्यानुसार या रुग्णालयातील कोव्हीड सेंटर बंद करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासह रुग्णालयास दुसऱ्या मजल्यापर्यंतची परवानगी असताना अनधिकृतपणे केलेल्या बांधकामाची तातडीने तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.

            यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी, तक्रारदारांच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी त्यावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्यास मनमानी कारभार करणाऱ्या अशा रुग्णालयावर कायदेशीर कारवाई करावी. तक्रारदारांच्या बिलांचे शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्ण ऑडीट करून त्यांना अधिकची रक्कम लवकरात लवकर मिळवून द्यावी. सदर तक्रारींच्या अनुषंगाने डॉ.वाईकर यांच्या कागदपत्रांची, घडलेल्या घटनांची तपासणी करून दोषी आढळल्यास मेडिकल निग्लीजंस आणि प्रोफेशन मिसकंडक्ट कायाद्यांर्गत डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्यावर कारवाई करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.     

 

*बैठकीतील ठळक मुद्दे*

कोरोना काळात रुग्णांची अखंडित सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याला आपला सलाम.

· *डॉ.कौस्तुभ वाईकर सारख्या डॉक्टरांमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा बदनाम होत आहे.

· रुग्णांची सातत्याने लुट करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास स्वस्त बसणार नाही.

· *डॉ.वाईकरांच्या कडून प्रलंबित घरफाळा तातडीने वसूल करा

· *सिद्धांत हॉस्पिटलच्या अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करा.

· *सिद्धांत हॉस्पिटल येथील कोरोना वॉर्ड बंद करण्याचा आदेश : उपायुक्त निखील मोरे*

· *दोषी आढळल्यास मेडिकल निग्लीजंस आणि प्रोफेशन मिसकंडक्ट कायाद्यांर्गत डॉ.कौस्तुभ वाईकर यांच्यावर कारवाई करून त्यांचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यासाठी प्रयत्न : आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे*

या बैठकीस माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उप आयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर, सहाय्यक आयुक्त चेतन कोंडे आरोग्य अधिकारी अशोक पोळ, शहर अभियंता नारायण भोसले, मुख्य लेखापरीक्षक वर्षा परीट, आदी उपस्थित होते.

No comments