Header Ads

Header ADS

राजारामबापू सोसायटी मार्फत किट मोफत वाटप

राजेंद्र निंबाळकर यांना सभासदांना वाटप करण्यासाठी किट देतांना संग्राम पाटील


कामेरी : सांगली जिल्हयात करोना व्हायरसचा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी गावात करोना रुग्ण आढळून आले आहेत. डॉक्टर, नर्स, पोलीस, स्वयंसेवक, ग्रामपंचायत, जिल्हा परीषद, वाळवा पंचायत समिती, सहकारी - खाजगी, सर्व संघटना, संस्थेमधील आजी व माजी पदाधिकारी, कर्मचारी तसेच सारीच शासकीय - निमशासकीय यंत्रणा दिवस - रात्र जनतेची सेवा करत आहेत. पण या योद्ध्यांसोबत असेही काही अनसंग हिरो आहेत जे पडद्याआड राहून आपआपल्या परिने समाजसेवा करत आहेत. यातलंच एक नाव म्हणजे युवा नेते संग्राम जगदिश पाटील यांनी सांगली जिल्हा चे पालकमंत्री ना. जयंतराव पाटील व सांगली जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी होमिओपथी गोळ्या व मास्क असे किट तयार करुन राजारामबापू पाटील विकास सेवा सोसायटी मधील सर्व सभासद, ठेवीदार, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तीना मोफत वाटप केले.
पाटील व सासोयटीनी अनेक शासकीय निमशासकीय यंत्रणा मध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत गोळ्या व मास्क दिल्या आहेत. यापुर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सर्व सभासद, ठेवीदार, कर्मचारी, शासकीय व निमशासकीय यंत्रणेत मास्क व सॅनिटायझर सोसायटी मार्फत मोफत वाटप केले आहे. तसेच पोर्टेबल ऑक्सिजन ची मोफत सोय केली आहे.
याबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, किट तयार झालं पण ते द्यायचं कसं याचा विचार करताना आम्ही असे ठरवले की, एका व्यक्तीकडून 10-15 सभासद यांना घरपोच किट द्यायचे असे ठरले, त्या साठी संचालक, कर्मचारी, स्वयंसेवक यांच्या मार्फत कीट मोफत वाटप करण्यात आले. ज्या ठिकाणी जाऊन देणं शक्य असतं तिथे संस्था प्रतिनिधी स्वतः जातो. पण जिथे जाणं शक्य नाही तिथल्या लोकांना संस्था कार्यालयात येऊन किट घेऊन जाण्यास सांगतो. जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा व्हावा हीच एकमेव इच्छा आहे.
सोसायटी चे चेअरमन निवास माने म्हणाले की, अशा कठीण काळात धंदा करणं हा मूळ उद्देश असू नये असं आम्हाला वाटतं. जेव्हा आम्ही किटचे वाटप करायला जातो तेव्हाही सॅनिटायझर चा वापर करतो व तोंडावर मास्क लावूनच घराबाहेर पडतो. कीट तयार करण्यापासून ते वाटप करेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेत आम्ही सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करतो. एवढंच नाही तर घरी आल्यावर घरातील कोणत्याही गोष्टीला स्पर्ष करण्याआधी आम्ही थेट आंघोळीला जातो आणि कपडे धुवायला टाकतो.
सोसायटीचे व्हा.चेअरमन सुर्याजी पाटील म्हणाले की, कोरोना काळात संचालक, कर्मचारी, स्वयंसेवक यांनी चांगले काम केले. त्या बद्दल मी सोसायटी मार्फत सर्वाचे आभार मानतो.
एकीकडे काळा बाजार, लुटमार असं समाजातील नकारात्मक चित्र समोर दिसत असताना संग्राम पाटील आणि राजारामबापू पाटील सोसायटी ज्यांच्यामुळे माणुसकीवरचा लोकांचा विश्वास कायम राहतो.
यावेळी संचालक विकास पाटील, अनिल पवार, राजेंद्र निंबाळकर, पोपट कदम, जमाल मुल्ला, जयसिंग पाटील, सुधीर आढाव, मालन पाटील, रेखा पाटील, आबासो पाटील, रंगराव पाटील, अनिल धनवडे, सर्जेराव पाटील, विवेक लोहार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत परीट, रोहित गायकवाड, संजय पाटील, अंकुश कणसे, नामदेव जाधव, राजेश पाटील, इंद्रजित पाटील, योगेश पाटील, जयकर पवार उपस्थित होते.
 


No comments