शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास फ्रीज प्रदान
बालिंगा :प्रतिनिधी: शिक्षक नेते व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेचे तज्ञ संचालक दादासाहेब गणपती लाड (सर) यांच्या वाढदिवसानिमित्त दादासाहेब लाड प्रेमी कार्यकर्त्यांकडून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयास गोदरेज कंपनीचा फ्रिज प्रदान करण्यात आला. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने इंजेक्शन व अन्य औषधे ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने फ्रीज देण्यात आला. राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते फ्रीज प्रदान करण्यात आला . यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समन्वयक अजित भास्कर , महेंद्र चव्हाण तसेच कोजिमाशि पतसंस्था चेअरमन बाळ डेळेकर,संचालक अनिल चव्हाण ,कैलास सुतार,कोल्हापूर जिल्हा कर्मचारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष मनोहर पाटील , मच्छिंद्र शिरगावकर, अशोक मानकर, सचिन पाटील, एस.पी. पाटील, प्रल्हाद पठाडे, मदन निकम , राजू पाटील आदी स्वाभिमानी शिक्षक सहकार आघाडीचे कार्यकर्ते व शिक्षक उपस्थित होते. १ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले रुग्णालयास १००० सिरींज, उम्मेद फाउंडेशन संचलित मायेच्या घरासाठी ५००० रुपये रोख या स्वरूपातही मदत दादा लाड प्रेमी मित्र परिवाराकडून करण्यात आली. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने समाजोपयोगी उपक्रम लाड सरांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून राबविण्यात आलेबद्दल वैद्यकीय क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. समाजभान ठेवून हा उपक्रम कार्यकर्त्याकडून राबविण्यात आला असून भविष्यातही आम्ही जिथे समाजाला गरज असेल त्या ठिकाणी नेहमीच सेवेसाठी तत्पर राहू अशी प्रतिक्रिया दादासाहेब लाड यांनी व्यक्त केली.
No comments