Header Ads

Header ADS

प्रामाणिक काम केलं की प्रपंच नेटका होतो.---बळीराम दिनकर उर्फ बी. डी. दिंडे.


     बालिंगा--प्रतिनिधी : आमशी.ता. करवीर. येथील के .डी. सी. सी. बँकेचे शाखाधिकारी बळीराम दिनकर दिंडे. (  बहिरेश्वर) हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा फेटा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी आमशी ग्रामपंचायत जेष्ठ  सदस्य भगवान गुरव. यांनी दिंडे यांनी केलेल्या ऊलेखनिय कार्याची माहिती दिली. यामध्ये सेवा निवृत्तीच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रामाणिक काम उत्कृष्ट सेवा, स्पष्ट व्यक्तिमत्व म्हणून दिंडे यांची पंचक्रोशीत ओळख आहे.आमशी बँक नफ्यात आणण्यात मोलाचा वाटा आहे. असे सांगून त्यांना  उत्तम आरोग्य लाभो .जनसेवा घडो असे मत व्यक्त केले.
   यानंतर सत्कार मूर्ती दिंडे सत्काराला उत्तर देताना म्हणाले माझी एकूण सेवा २८ वर्षे झाली. त्यापैकी १९ वर्षे सेवा आमशी गावात झाली. आमशी गावच्या कुटूंबातील सदस्य म्हणून गावाने माझा स्विकार करून सहकार्य केले. असे सांगून प्रामाणिक सेवा केली की प्रपंच नेटका होतो. तो माझा झाला आहे.जिल्हा बँक नफ्यात आणण्यासाठी बँकेच्या हिताचा विचार आणि शेतकऱ्यांचे हित लक्ष्यात घेऊन शेतकऱ्याच्या पीक कर्जातून ठेव पावती घेऊन बँक आणि सभासद यांचे हित जोपासले. आमशी गावच प्रेम आणि बँकेच्या जीवावर मुलगा इंजिनियर तर मुलगी डॉक्टर करण्यात यशस्वी झालो हिच माझ्या कामाची पोच पावती मिळाली असे त्यांनी यावेळी सांगितले.
    या सत्कार प्रसंगी सरपंच उज्वला पाटील, उपसरपंच नामदेव  पाटील , ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील,  पल्लवी पाटील, बाजीराव कांबळे, रेष्मा लोखंडे, सर्जेराव पाटील,रामनाथ पाटील,  जयदीप पाटील,ग्रामसेवक शिवाजी वाडकर, क्लार्क राहुल सावंत,  डाटा आपरेटर बाबुराव पाटील.आदी उपस्थित होते. आभार तानाजी पाटील. यांनी मानले.

No comments