रसिका पाटील.यांच्यामुळे २१ वर्षाचा प्रश्न निकालात बालिंगे-फुलेवाडी रस्त्यासाठी आणला ४९ लाख ५९ हजारांचा निधी.:सरपंच मयूर जांभळे.
प्रथमेश वाडकर :बालिंगा:प्रतिनिधी शिंगणापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या रसिका अमृत उर्फ अमर पाटील (शिंगणापूरकर) या शिंगणापूर जिल्हा परिषद मतदार संघातून अपक्ष निवडून आल्या आहेत. त्यांनी आपल्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयाची विकास कामे करून मतदार संघात आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे. बालिंगा गावात आतापर्यंत दिड कोटींची विकास कामे केलेली आहेत. बालिंगा गावचे सरपंच युवा नेतृत्व मयूर मधुकर जांभळे. यांनी जि. प. सदस्या रसिका पाटील.व अमृत उर्फ अमर पाटील. यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील बालिंगा ते रिंगरोड फुलेवाडीला जोडणाऱ्या रस्त्याला तब्बल गेली २१ वर्षे डांबर व मुरमाचा वनवास पाहिला. या परिसरातील कॉलनीतील गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे., रस्त्यात खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. सदस्या पाटील. यांच्याकडे बालिंगा - फुलेवाडी दरम्यानच्या रस्ता आणि साईट गटरसाठी आपल्या कडून निधी मिळावा अशी मागणी सरपंच मयूर जांभळे.यांनी केली होती.तसेच
कोल्हापुर- फुलेवाडी रिंग रोडला जोडणारा पर्यायी रस्ता म्हणून बालिंगे रस्त्याकडे पाहिली जाते. हा रस्ता तत्कालीन दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या काळात तत्कालीन पं. स. सदस्य व राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे( तात्या ) यांच्या पाठपुराव्यामुळे सन २००० मध्ये या बालिंगा -रिंगरोड रस्त्याचे डांबरीकरण झाले होते.त्यास आज२१ वर्षे पूर्ण झालीत. या पर्यायी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. गेली २१ वर्षे रस्त्याचे काम न झाल्यामुळे आणि कॉलनीची उंची वाढल्याने महालक्ष्मी कॉलनी व इतर कॉलनीतील घरांतील सांडपाणी,गटारीचे पाणी थेट रस्त्यावरून वाहत होते.तसेच येथील पाईपलाईनला गळती लागली होती. नागरिकांची हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी सातत्याने होत होती. याची दखल घेऊन जिल्हा परिषद सदस्या रसिका अमर पाटील. व अमर पाटील.यांनी ग्रामीण रस्त्याचा विकास व मजबुतीकरण कार्यक्रम यामधून ( ३०५४-२०९९ ) सन२०२०-२१ मधून बालिंगा- फूलेवाडी जोड रस्ता कामास. प्रशासकीय रक्कम रुपये ४९,५९,५७१\- इतक्या निधीस मंजुरी घेतली. सरपंच मयूर जांभळे.यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा सदस्या पाटील.यांच्यामुळे पूर्णत्वास आला आणि खरोखरच बालिंगा--- फुलेवाडी रस्त्याचा २१ वर्षाचा वनवास रसिका पाटील.आणि अमर पाटील. यांच्या मुळे संपला.सरपंच मयूर जांभळे यांच्या पाठपुरावाला यश आले.
चौकट
बालिंगा- फुलेवाडी दरम्यानच्या रस्त्यासाठी मयूर जांभळे यांनी रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचे सांगून यासाठी जि.प.सदस्या रसिका पाटील व अमर पाटील यांनी ४९ लाख५९ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या बद्दल बालिंगा गावच्या वतीने आभार मानले. व टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून पावसाळ्यानंतर काम सुरू होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. एकंदरीत २१ वर्षाचा रस्त्याचा वनवास संपला खरा पण जाता जाता त्या कामासू आणि प्रामाणिक दिवंगत माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर .यांची आठवण करून गेला.
बालिंगे: बालिंगे-फुलेवाडी रस्त्यावर मुरूम टाकल्यानंतर झालेल्या रस्त्याचे काम
No comments