डॉक्टर्सशी सातत्याने संवाद / माझा डॉक्टर संकल्पना
**
कोविड परिस्थितीत निश्चित असे वैद्यकीय उपचार नसल्याने तसेच विषाणूच्या सतत बदलत जाणाऱ्या अवतारांमुळे वैद्यकीय क्षेत्रासमोर आज आव्हान उभे राहिले आहे.
लस आली असली तरी सर्व लोकसंख्येला दोन डोस देण्यापर्यंत कालावधी जाणार आहे
तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो ही भीती आहे
हे सर्व लक्षात घेऊन आम्ही सातत्याने सर्व डॉक्टर्सशी संवाद साधण्यावर भर दिला आहे
*महाराष्ट्र हा देशातले पहिले राज्य आहे ज्यांनी तज्ञ डॉक्टर्सचा टास्क फोर्स केला*
*सर्व जिल्ह्यांत स्थानिक तज्ञ डॉक्टर्सचे टास्क फोर्स केले.*
*लहान मुलांमधील कोविडसंदर्भात बाल रोग तज्ञांचा टास्क फोर्स*
*दोन्ही टास्क फोर्समध्ये वैद्यकीय उपचारासंदर्भात सतत संवाद*
*सर्व खासगी डॉक्टर्सना सहभागी करून व्याप्ती वाढविण्यासाठी ऑनलाईन वैद्यकीय परिषदांचे आयोजन*
उपचार पद्धतीत एकसूत्रता हवी, विषाणूच्या बदलत्या स्वरूपामुळे डॉक्टर्सना तज्ञांकडून योग्य ते मार्गदर्शन व्हावे व त्यांच्या शंकांचे समाधान व्हावे, यावरील नवनवीन माहिती त्यांना मिळावी व सर्व डॉक्टर्सचा सहभाग वाढवा म्हणून ऑनलाईन वैद्यकीय परिषदांचे आयोजन करण्याचे ठरविले
मुंबईतील १ हजार फॅमिली डॉक्टर्स, जनरल फिजिशियन यांच्याशी संवाद
राज्यभरातील १७ हजार फॅमिली डॉक्टर्स, जनरल फिजिशियन यांच्याशी संवाद
राज्यभरातील ६ हजार बाल रोग तज्ञांशी संवाद
महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या माध्यमातून २१ हजार ५०० डॉक्टर्सची परिषद
*( एकूण सुमारे ४५ हजार डॉक्टर्स प्रत्यक्ष सहभागातून आणि ५० हजार दर्शक असे १ लाख डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रातील इतरांशी उपचारासंदर्भात टास्क फोर्सचा संवाद)*
No comments