जिल्ह्यातील अपुर्ण अवस्थेतील पाटबंधारे प्रकल्पांकरीता तातडीने निधी उपलब्ध करा – संजय मंडलिक

कोल्हापूर जिल्ह्यातील अपुर्ण अवस्थेमध्ये असलेले पाटबंधारे प्रकल्प पुर्ण करणेसाठी आवश्यक असणारा निधी तातडीने मिळावा याकरीता खासदार संजय मंडलिक यांनी जलसंपदा मंत्री नाम. जयंत पाटील यांचेकडे आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीदरम्यान केली. या बैठकीस आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकार दौलत देसाई,पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सुर्वे, यांचेसह कार्यकारी अभियंता, पुनर्वसन अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन २०१९ च्या पुरपरिस्थितीची आठवण करुन देत खासदार संजय मंडलिक यांनी पावसाळ्यामध्ये महापुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत असलेकारणाने पुरामूळे कमीतकमी क्षेत्र बाधीत होणेच्या दृष्टीने पूर प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे या बैठकीदरम्यान सांगितले. यासंदर्भात खासदार मंडलिक यांनी राधानगरी धरणास ७ स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्ण क्षमतेने भरलेनंतरच दरवाजे उचलले जाऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होतो.
कोल्हापूर शहराचे पूरनियंत्रणासाठी धरणातून विसर्ग करणेसाठी रेडियल गेट बसविणे गरजेचे आहे. तथापि यासाठी वेळ लागणार असल्याने धरणाचे सर्व्हिस गेटचे ऑटोमायजेशन केले तरी पुरावर नियंत्रण येणार आहे. यासाठी सुमारे 4 कोटी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. यासंदर्भात जलसंपदा विभागाचे सचिव श्री. गुणे यांनी सदरची कल्पना चांगली असून यावर आंम्ही विचार करत असल्याचे खासदार मंडलिक यांना सांगितले.
पंचगंगा नदीला येणा-या पुरामध्ये धामणी खो-यातून येणा-या पाण्याचा समावेश आहे. धामणी नदीवरील धामणी प्रकल्पाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे ८ ते १० टीएमसी पाणी हे अनियंत्रित पध्दतीने पंचगंगा खो-यात येते. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास धामणी खो-यामधील पाणी नियंत्रण पध्दतीने पंचगंगा खो-यात सोडून पुरावर काही प्रमाणात नियंत्रण आणता येईल. याकरिता धामणी प्रकल्पास आवश्यक निधी देऊन धामणी प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे खास.मंडलिक यांनी बैठकीदरम्यान सांगितले.
No comments