Header Ads

Header ADS

देवेंद्र फडणवीस भेटीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरी



मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची आज त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


दरम्यान, या भेटीबाबत आणि भाजपच्या बहिष्काराबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पासाठी दिवसरात्र परिश्रम घेतले. रात्रीच्या २ ते ३ दरम्यानदेखील देवेंद्र फडणवीसांनी कामाच्या ठिकाणी भेटी दिल्या. तुम्ही श्रेय घ्या, मात्र ज्यांनी पाया रचला किंबहुना प्रकल्प पूर्णत्वास नेला त्यांना कार्यक्रमांना बोलवणं गरजेंचं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी झालं नाही, मात्र गेल्या काही दिवसापासून असा पाया महाविकास आघाडीने रोवलाय, म्हणून विरोधी पक्षाकडून दोन्ही कार्यक्रमांवर बहिष्कार घातला”


देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीपूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरुन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेनंतर लगेचच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे

No comments