मुरगूड पालिका मुख्याधिकारीपदी हेमंत निकम
मुरगूड(शशी दरेकर): मुरगूड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी हेमंत आबासाहेब निकम यांची नियुक्ती झाली आहे. संजय गायकवाड यांची बदली झाल्यानंतर कागलचे मुख्याधिकारी पंडीत पाटील यांच्याकडे तात्पुरता कार्यभार होता. आज नुतन मुख्याधिकारीपदाचा पूर्ण कार्यभार निकम यांनी पदभार स्वीकारला.
नूतन मुख्याधिकारी हेमंत निकम यांचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
पालिकेच्या यशवंतरावजी चव्हाण सभागृहात नूतन मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी आपला परिचय करून देत सर्व नगरसेवकांचा परिचय करून घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, उपनगराध्यक्षा सौ. रेखाताई मांगले, पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, पालिका अभियंता प्रकाश पोतदार, मुख्य लेखापाल अनिकेत सुर्यवंशी, अधिक्षका स्नेहल पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, पालिका कर्मचारी उपस्थित होते.
मुख्याधिकारी हेमंत निकम यांची जयसिंगपूर पालिकेतून येथे बदली झाली. त्यांनी आतापर्यंत रोहा, धूळे, आष्टा, कराड, मलकापूर येथे सेवा बजावली आहे. या पदावर त्यांनी ११ वर्ष त्यांनी सेवा केली आहे.
No comments