जिल्हा माहिती कार्यालयातील पर्यवेक्षक रामदार परब सेवानिवृत्त
सिंधुदूर्गनगरी दि.31 - जिल्हा माहिती कार्यालयातील पर्यवेक्षक रामदास श्रीधर परब हे नियत वयोमानानुसार आज शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने माजी उपसंचालक श्री.सतीश लळीत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुंष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक गणेश रामदासी आणि कोल्हापूर विभागाचे उपसंचालक अनिरुध्द अष्टपुत्रे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यातून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री परब यांचे चिरंजीव स्वरुप परब, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, माहिती सहाय्यक हेंमतकुमार चव्हाण यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी रवींद्रकुमार चव्हाण, संदीप राठोड, रवींद्र देवरे, अविनाश होडावडेकर तसेच निवृत्त कर्मचारी चंद्रकांत कारिवडेकर, लक्ष्मीकांत वेगुर्लेकर व गोव्याचे कर्मचारी नरेद्र खोबरेकर हे उपस्थित होते.
0000
No comments