Header Ads

Header ADS

शिरोळ नगरपरिषदेला सर्वोतोपरी सहाय्य -जलसंपदा मंत्री जयंत पाटील



कोल्हापूर, दि. 31 : शिरोळ नगरपरिषद स्थापनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत मात्र या संस्थेच्या स्वत:च्या इमारतीचा प्रश्न प्रलंबित तो लवकरच निकाली काढू. जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला अपेक्षित असलेली जागा मोजणी करुन ती लवकरात लवकर हस्तांतरीत करावी, असे निर्देश मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

शिरोळ येथील जुने तहसिल कार्यालय शिरोळ नगरपरिषदसाठी हस्तातंरण करण्यासाठी आणि कल्लेश्वर तलाव सुशोभिकरणाच्या अनुषंगाने राजर्षी शाहूजी सभागृहात आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. शिरोळ येथील गायरान जागा वगळून उर्वरित 20 टक्के क्षेत्रावर तलाव सुशोभिकरणासाठी परवानगी देण्यात येत असल्याचेही श्री. पाटील म्हणाले.

यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तैमूर मुलाणी आदी उपस्थित होते.

0000000

No comments