कोल्हापूर महानगरपालीकेतफे 208 नागरीकांचे लसीकरण
शहरामध्ये सोमवारी 4 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामध्ये 60 वर्षावरील 11 नागरीकांना कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर 197 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला. शहरामध्ये पहिला व दुसरा डोस मिळून 208 नागरीकांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र कसबा बावडा येथे 50, महाडीक माळ येथे 100, सदरबाजार येथे 58 इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शहरामध्ये आज अखेर 124243 इतक्या पात्र लाभार्थ्याना पहिल्या डोसचे तर 45345 इतक्या पात्र लाभार्थ्यांना दुस-या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरीकांनी कोव्हिशिल्डच्या दुस-या डोस घेण्यासाठी ज्यांचे 84 दिवस पुर्ण झालेले आहेत अशा नागरीकांनी दि.22 जून 2021 रोजी महापालिकेच्या 11 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहावयाचे आहे.
उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणा-या 44 विद्यार्थ्यांना व 43 दिव्यांग नागरीकांना लसीकरण
शहरातील परदेशात उच्च शिक्षण घेणेकरीता जाणा-या विद्यार्थी व दिव्यांग नागरीकांसाठी सोमवारी नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे विशेष लसीकरण मोहिमेचे महापालिकेच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेत परदेशात जाणाऱ्या 44 विद्यार्थ्यांना व 43 दिव्यांग नागरीकांना लसीकरण करण्यात आले. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिला डोस 41 व दुसरा डोस 3, तर दिव्यांग नागरीकांना पहिला डोस 39 व दुसरा डोस 4 असे एकूण 87 विद्यार्थी व दिव्यांगांना कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले.
No comments