Header Ads

Header ADS

सराफी दुकाने सुरू करण्याचीमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना सराफी दुकाने सुरू करण्यासंबंधी अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी निवेदन दिले. यावेळी सचिव रवींद्र राठोड, संचालक प्रीतम ओसवाल, सुहास जाधव, तेजस धडाम व प्रसाद कालेकर आदी उपस्थित होते.

कोल्हापूरता. 21 -  कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या 15 एप्रिलपासून सराफी दुकाने बंद आहेत. यामुळे फक्त सराफ व्यावसायिक नाही तर यावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांनाही मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावीअशी मागणी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने आज पालकमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांकडे करण्यात आली.

 शासकीय विश्रामधाम येथे पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. यासंबंधी अधिक माहिती देताना अध्यक्ष कुलदीप गायकवाड म्हणालेआम्ही सर्व सराफ व्यावसायिक सॅनिटायझरमास्क व सुरक्षित अंतराबरोबर शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहोत. इतकेच नाही तर दुकानात मुळात ग्राहकांची संख्याही मर्यादित असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका पर्यायाने कमी आहे. त्यामुळे शासन नियमांच्या अधीन राहून आम्हाला दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी.

ते म्हणालेशासनाचे विविध करतीन महिन्यांच जीएसटी करवीजपाणी बिलघरफाळा माफ करण्याबरोबरच बँक कर्जाच्या व्याजामध्ये सवलत मिळावीअशाही आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यांचाही सहानतीपूर्वक विचारविनिमय होऊन दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी. यावेळी सचिव रवींद्र राठोड, संचालक  प्रीतम ओसवाल, सुहास जाधव, तेजस धडाम व प्रसाद कालेकर आदी उपस्थित होते. दरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी लवकरच मार्ग काढू, असे आश्वासन दिले.

No comments