Header Ads

Header ADS

'ब्रेक दि चेन' अंतर्गत 'स्तर 4' चे निर्बंध जिल्ह्यात 7 जून पासून लागू होणार :जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर,  ब्रेक दि चेन अंतर्गत आज विविध जिल्ह्यातील कोरोनाच्या बाधित दरानुसार(पॉझिटिव्हीटी रेटनुसार) राज्य शासनाने विविध पाच स्तर निश्चित केले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्तर 4 चे निर्बंध लागू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

   'ब्रेक दि चेन' अंतर्गत 'स्तर 4' चे निर्बंध जिल्ह्यात दिनांक 7 जून पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. यापूर्वी लागू असलेले निर्बंध 6 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहतील. दिनांक 7 जून पासून लागू असणाऱ्या निर्बंधांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मान्यतेने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी स्पष्ट केले.
000000

No comments