शिरोली दुमालात 5 जून ते 9 जून कडक लाॅक डाऊन.
प्रथमेश वाडकर : बालिंगा /प्रतिनिधी.
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला भागात येथे कोरोना संसर्ग असलेले पेशंट जास्त प्रमाणात सापडत आहेत. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत व कोरोना दक्षता समितीने शिरोली दुमालात 5 जून ते 9 जून कडक लाॅक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंद काळात गावातून बाहेर जाता येणार नाही, गावाबाहेरील फेरीवाल्यांना गावात प्रवेश मिळणार नाही, गावातील जिल्ह्याबाहेरील येणाऱ्या लोकांना सक्तीने अलगीकरण आत ठेवण्यात येईल, आरोग्य कर्मचारी व दक्षता समिती तसेच यांना चुकीची माहिती द्यायची नाही, विनाकारण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई होईल व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईल असे पत्रकाद्वारे उपसरपंच सचिन विश्वासराव पाटील यांनी माहिती दिली. या लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद राहणार आहे.
No comments