Header Ads

Header ADS

शासकीय पुरावा दया ग्रामपंचायतीला बाळाच्या नाव नोंदणीला*. *शासनाकडून आणखी 5 वर्षाची मुदतवाढ.*


 प्रथमेश वाडकर:बालिंगा : प्रतिनिधी.
     जन्म नोंदणी करिता गावस्तरावर ग्रामपंचायत असो किंवा महानगर पालिका असो जन्माची नोंद या दोन ठिकाणी आवर्जून केली जाते. पण त्यावेळी बाळाच्या नावाची नोंद आई, वडील किंवा घरची मंडळी बाळाचं बारस, जाऊळचा कार्यक्रम झाला तरी ग्रामपंचायत किंवा महानगर पालिका येथे करायची विसरून जातात.आणि बाळाला पहिलीत घालतानाचं गावची ग्रामपंचायत किंवा महानगर पालिके ची पायरी चढतात.त्यावेळी बाळाच्या नावाची नोंद करण्यासाठी अडचण येत होती. यासाठी जन्म मुर्त्यू नोंदणी अधिनियम 1969 चे कलम 14 व महाराष्ट्र जन्म मुर्त्यू नोंदणी अधिनियम 2000, नियम क्र.10 नुसार जन्म नोंदणीमध्ये  नोंदणी दिनांकापासून 15 वर्षापर्यंत बाळाच्या नावाची नोंद करण्याची तरतूद आहे.राज्य शासनाने अधिसूचना क्रमांक 115, जमृनो ---- 2020/2021/प्र. क्रं.326/कु. क. दि.28/04/2021अन्वये दि.27/04/2026. पर्यंत सर्व नागरिकांची नावे जन्म नोंदणीत समाविष्ट करण्याबाबत कळविले आहे.
ज्या नागरिकांच्या मुलांच्या जन्माची नावाशिवाय नोंदणी दि.1 जानेवारी 2000 पूर्वी झालेली आहे. व ज्यांच्या नोंदणीला 15 वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे. अशा सर्व नागरिकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर नावे जन्म रजिस्टर मध्ये नोंदणीकरिता बाळाचे नाव समाविष्ट करणेबाबतचा अर्ज ग्रामपंचायत किंवा महानगर पालिका यांच्या कडे दाखल करून नावाची नोंदणी करताना नावाचा एक शासकीय पुरावा म्हणून शाळा सोडलेला दाखला, एस. एस. सी. प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड. या कागद पत्राच्या प्रती अर्जसोबत सादर कराव्या लागणार आहे. जन्म नोंदणीच्या वेळेस अर्जदाराने ठेवलेले नाव बदलता येणार नाही. सदर नाव नोंदणीची मुदत फक्त दि.27 एप्रिल 2026. पर्यंतच आहे. त्यानंतर नाव समाविष्ट करण्याचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत  वाढवून मिळणार नाही.याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.  व या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन निबंधक जन्म मुर्त्यू विभागामार्फत करण्यात आले आहे.

No comments