चंद्रेश्वर प्रभागातील मरगाई गल्ली येथील विशेष कॅम्पला प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांची भेट
कोल्हापूर ता. 09 : शहरातील कोरोना बाधीतांच्या संख्येनुसार महापालिकेने टॉप 10 प्रभाग संवेदनशिल काढले आहेत. शहरातील अशा संवेदनशिल प्रभागामध्ये महापालिकेच्यावतीने विशेष कॅम्पद्वारे कोरोना तपासणी केली जात आहे. सकाळी मरगाई गल्ली येथे विशेष कॅम्पच्या ठिकाणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी भेट दिली. प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांशी त्यांनी संवाद साधून सर्दी, खोकला तापाची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकिय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या प्रतिबंधीत क्षेत्रातील नागरीकांनी घराबाहेर पडू नये. बाधीतांच्या संपर्कात आलेल्या नागरीकांनी स्वत:हून पुढे यावे जेणेकरुन पुढचे धोके आपल्याला टाळता येतील. महापालिकच्या आरोग्य विभागामार्फत दैनंदिन होणाऱ्या सर्व्हेक्षणास नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. सर्व्हेमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास त्या सर्वांचे स्वॅब घेणेबाबत वैद्यकिय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
इंदिरासागर हॉल येथे सुधाकर जोशीनगर झोपडपट्टी परिसरातील 60 वर्षावरील व व्याधीग्रस्त नागरीकांसाठी विशेष कॅम्पद्वारे लसीकरण राबविण्यात येत होते. याठिकाणी प्रशासक यांनी भेट देऊन लसीकरणाची पाहणी केली. याठिकाणी बुधवारी 152 नागरीकांना लसीकरण करण्यात आले.
यावेळी उप-आयुक्त रविकांत आडसूळ, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ.योगिता भिसे, पाणीपट्टी अधिक्षक प्रशांत पंडत, आरोग्य निरिक्षक ऋषीकेष सरनाईक, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी उपस्थित होते.
No comments