करवीर तालुक्यातील पश्चिम भागामध्ये रोहिणी नक्षत्रावर धूळ वाफ भात पेरणीस सुरुवात*-------.
*
प्रथमेश वाडकर :बालिंगा /प्रतिनिधी. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रोहिणी नक्षत्रावर धूळ वाफ भात पेरणी सुरुवात झाली आहे. कोगे, महे, कसबा बीड, शिरोली दुमाला, सावर्डे दु,चाफोडी आदी भागांमध्ये मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मे महिना सुरू झाला की शेतकऱ्यांच्या मशागतीच्या कामास जोरदार सुरुवात होते. यामध्ये नांगरणे, कुळवणे, दिंड मारणे, शेताची सपाटीकरण करणे आदी कामाची सुरुवात चालू असते. ही सर्व कामे झाली की,रोहिणी नक्षत्रावर धूळ वाफ पेरणी केली जाते. धूळपेरणी चा फायदा म्हणजे रोहिणी नक्षत्रावर लागणाऱ्या पावसामुळे पिकांची चांगल्याप्रकारे वाढ होते व लवकर पेरणी झाल्यामुळे उंची वाढते. जून महिन्यानंतर पावसाळा ऋतू मध्ये पिकाची प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे धूळ वाफ पेरणीस शेतकऱ्यांना ही पेरणी महत्त्वाची असते.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला असल्याने सर्वच क्षेत्रात जागतिक मंदी आलेली म्हटले तरी वावगे होणार नाही. कोरोना रोगामुळे सर्व चाके थांबली जरी असली, तरी जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हा आपलं कार्य निस्वार्थीपणाने व निसंकोचपणे करत असतो. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळणार होती, पण त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. तरी सुद्धा न डगमगता आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या या सर्व शेतकऱ्यांना मानाचा मुजरा.
शेतात सुरू असलेली धूळ वाफ पेरणीचे छायाचित्र.
No comments