Header Ads

Header ADS

वन्य प्राण्याच्या हल्ल्यात शिरोली दुमाला 10 बकऱ्यांचा मृत्यू . जवळपास 2 लाखाचे नुकसान.


 प्रथमेश वाडकर :बालिंगा /प्रतिनिधी.
शिरोली दुमाला तालुका करवीर येथील गावाच्या पश्चिमेला गुरव  खडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री बकऱ्याच्या तळावर वन्यप्राण्यांचा हल्ला होऊन 10 बकऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये जवळपास 2 लाखाचे नुकसान झाले.

 घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिरोली दुमाला गावच्या पश्चिमेस गुरव खडी परिसरात आंब्याच्या बाग शेतात रघुनाथ विठ्ठल गावडे राहणार सावरवाडी या मेंढपाळ यांचा बकऱ्याचा तळ बसलेला होता. गुरुवार रात्री पाऊस असल्याने मेंढपाळ शेतामध्ये झोपण्यासाठी गेले होते. अचानक वन्य प्राण्यांने बकरी तळावर हल्ला केल्याने 10 बकरी मयत झाली. हातावरचे पोट, रानोमाळ फिरणारे मेंढपाळ या हल्ल्याने पूर्णपणे धास्तावले आहेत. घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, वनविभागाचे अधिकारी डॉ ए एस इंगळे, डॉ ए एस माने, वनरक्षक विजय पाटील, बाळासाहेब कोळेकर,बाबासाहेब धनगर, यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला.

No comments