Header Ads

Header ADS

*कांबळे कुटुंबावर उपासमारीची वेळ**तीन मुलींचा शैक्षणिक खर्च व अन्न धान्यांच्या मदतीसाठी करतायत धडपड*....

 
 प्रथमेश वाडकर :बालिंगा : प्रतिनिधी. शैक्षणिक व अन्नधान्याच्या मदतीसाठी कांबळे कुटुंबाची धडपड सुरूझाली आहे.उपचारा दरम्यान मृत्यू पावलेल्या ऊत्तम कांबळे यांच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याने शैक्षणिक व अन्नधान्याच्या मदतीसाठी  धडपड सूरु आहे 
     करवीर तालुक्यातील घानवडे येथील एका गरीब घराण्यातील मुलगा ऊत्तम कांबळे हा शिक्षण घेत असतानाच वडिलांचे निधन झाल्याने  उत्तम कांबळे यांच्यावर घरची सर्व जबाबदारी पडली.      
           आपल्या घरचा गाडा चालविण्यासाठी शेताचा एकही तुकडा नसताना अर्थीक परिस्थिती बेताची असल्यामुळे कांबळे हा मिळेल ते काम करुन रोजगार करुण आपल्या संसाराचा गाडा चालवू लागला.
         त्याच्या परिवारामध्ये त्याला लहान तीन मुली, आई व पत्नी असा परिवार असल्याने त्यांची अर्थीक बाजू कमकूवत होत गेली गावोगावी जाऊन सेंट्रींगचे काम करत घरातील सुखाचा संसार चालू झाला. पण अचानक काळाने त्याच्यावर घाला घातला  कांबळे यांना चक्कर आल्याने त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून तात्काळ उपचार चालू केले.त्यासाठी एक लाख पाच हजार ईतका खर्च आल्यानेउत्तम याचा प्रामाणिक स्वभाव यामुळे हा खर्च घानवडे गावातील लोकांनी मदत स्वरूपात दिला.मदतीचा ओघ सूरु झाली व पैशाची जुळणी झाली म्हटल्यावर उत्तमच्या पत्नी, तीन मुली, व आई यांच्या जीवात जीव आला आपला पोरगा, आपला पती, आपलं वडील दवाखान्यातून  बर होऊन लवकरच घरी परत येणार या आशेने सर्वच आनंदात होते.सर्वांनाच यामध्ये अपयश स्वीकारावे लागले व उत्तमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा संसार,घरदार उघड्यावर पडलं.
           घरची परिस्थिती हलाखीची असलेल्या कांबळे कुटुंबावरती पून्हा उपासमारीची वेळ येऊ लागल्याने शैक्षणिक व अन्नधान्याच्या मदतीसाठी धडपड सुरु झाली आहे. यासाठी दानशूर व्यक्तींना मदत करण्यासाठी किंवा तीन मुलींची  शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्यासाठी उत्तमच्या घरची मंडळी व घानवडे गावातील ग्रामस्थ मागणीवजा आवाहन करीत आहेत. खरोखरच असा प्रसंग कोणावरही येऊ नये कांबळे कुटुंबियांचा आधार म्हणजे ऊत्तम पण उत्तमच्याअचानक जाण्याने घरचं आडच मोडलं आता त्या घराला आधार देण्याची व मुलींची शैक्षणिक गरज पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच मदत  करणे म्हणजे कांबळे कुटुंबियांना नवसंजीवनीच दिल्यासारखं होईल यासाठी आपण सर्वांनी अन्नधान्य व शैक्षणिक खर्च उचलण्याची गरज आहे.

चौकट.
*शिक्षण अर्ध्यावरच सोडून संसाराचा गाडा ओढला*
उत्तम लहान असतानाच त्याच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले घरची सर्व जबाबदारी त्याच्यावर पडली पण तो डगमगला नाही. शिक्षण अर्धवट सोडून मिळेल ते काम करून घर चालवू लागला. त्यातही त्याला अपयश आलं वयाच्या 35 व्या वर्षी त्याच अचानक निधन झाले त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी तीन मुलींचा शैक्षणिक खर्च व त्यांना अन्नधान्य स्वरूपात मदत करावी असं आवाहन या निमित्ताने केलं आहे.

1 comment: