सर्वसामान्य रुग्णांचा आधार बंटी सावंत
प्रथमेश वाडकर : बालिंगा :प्रतिनिधी. कोल्हापूरचं सी. पी. आर. हॉस्पिटल म्हटलं की डोळ्यासमोर एकच नाव येत ते म्हणजे स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांचा वारसा अखंड व निस्वार्थीपणे पुढे चालू ठेवणारा सच्चा कार्यकर्ता बंटी सावंत. (भाऊ ) यांच एकदाका सी. पी. आर. मध्ये पेशंट दाखल झाला की पुढील सर्व जबाबदारी भाऊंची हे समीकरण ठरलेलंचं . दिवसभरात त्या पेशंटच्या वॉर्डात जाऊन तो पेशंट आपला घरचाचं नातेवाईक आहे. असं समजून तब्बेतीची विचारपूस करण्यापासून ते त्याच्या औषध व जेवणाची व्यवस्था करण्या पर्यंतचा सर्व खटाटोप करतो तोच हा अवलिया होय.सामाजिक जीवनात आपण आजवर शेकडो लोकांना जनतेची निस्वार्थी सेवा करतांना आपण जवळून पाहिले आहे.पण काही लोकअसे आहेत. ज्यांनी आपलं आयुष्य रुग्णांची सेवा करण्यासाठी अर्पण करून सर्व रुग्णांच्या हृदयात आयुष्य भरासाठी जागा निर्माण केली आहे.ज्यांची प्रामुख्याने सी.पी.आर.मधील रुग्णांची सेवा म्हणून काम करणारे आणि ज्यांना त्यांच्या निस्वार्थी कामातून जनतेनेआरोग्य दूत म्हणून पदवी बहाल केली. ते माजी आरोग्य मंत्री दिवंगत दिग्विजय खानविलकर. वारसा चालवणारे कोल्हापूर येथील आरोग्यदूत विरेंद्र सावंत उर्फ बंटी (भाऊ ) यांचे स्थान निश्चितच सर्वां पेक्षाही पुढचे आहे. या मित्राने आतापर्यंत तन - मन - धन अर्पून सी.पी.आर.मधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. कोल्हापूर, सांगली, उत्तर कर्नाटकासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी या तळकोकणातील अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकांशी बंटी सावंत यांचे घट्ट आणि कौटुंबिक नाते जमले आहे. कोरोना संसर्गाच्या या कालावधीत तर शेकडो लोकांचे प्राण वाचविण्याचे काम या ' अवलियाने ' केले आहे. म्हणूनच या 'अनमोल रत्नाचा 'अभिमान वाटतो. अशा या रुग्ण सेवकाचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा.......
No comments