Header Ads

Header ADS

करवीरच्या पश्चिम भागात शिवस्वराज्य दिन शिवमय वातावरणात पार..


  प्रथमेश वाडकर : बालिंगा:प्रतिनिधी. 
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज शिवराज्याभिषेक. या निमित्ताने शासनाने दिलेल्या आदेशानुसार  करवीरचे  गटविकास अधिकारी जयवंत उगले.यांनी दिलेल्या शासकीय सूचनांचे  पालन करून सर्व ग्रामपंचायतीनी शिवस्वराज्य दिन उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.सर्व ग्रामपंचायतीच्या  वतीने शिवाजी महाराज्यांच्या पाच शुभ चिन्हानी आलंकृत  भगवा ध्वज ज्यावर जिरेटोप, राजमुद्रा, सोन्याचे होन, जगदंब तलवार, वाघनखे  असलेला ध्वज त्यावर कलश  फुलांच्या माळा, राजदंडास (बांबूच्या) सभोवती  गुडाळलेले  सुवर्ण व लाल कापड आदींनी ध्वज सर्वांचे लक्ष्य वेधून घेत होता. बालिंगा ते आरळे घानवडे . तसेच बालिंगा ते भामटे. परिसरात शिवस्वराज्य दिन उत्साहात व आनंदात पार पडला.

No comments