मरावे परी किर्तीरुपी उरावे*........ *दिवंगत कॉम्रेड मारुतीराव निकम यांच्या जयंती निमित्त वृक्षारोपण
प्रथमेश वाडकर :बालिंगा :प्रतिनिधी. ज्यांनी आपलं उभं आयुष्य ग्रामपंचायत कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी खर्ची घातलं. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी याच्या मागण्या मान्य करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद असो वा मुंबई मंत्रालय किंवा नागपूर आधिवेशन असो कोल्हापूरचे कॉ. मारुतराव निकम. मागण्या मान्य करून घेण्यासाठी उत्सहाने सर्वात पुढे असायचे. याचं महत्वाचं कारण पूर्वी ग्रामपंचायत कर्मचारी यांना आठशे ते नऊशे पगारअसायचा यामध्येत्याचा संसार कसा चालायचा याची त्यांना काळजी यासाठी शासनाशी संघर्ष करून किमान वेतन लागू करण्यात कॉ. निकम यशस्वी झाले. आज तोच कर्मचारी दहा ते बारा हजार पगार घेतो. याचं सर्व श्रेय कॉ निकम. यांनाच जातं. कॉ निकम. यांचे दोन वेळा बायपास होऊन सुद्धा आपल्या मागणी पासून ते हटले नाहीत.अखेर पर्यंत वयाच्या 87 व्या. वर्षापर्यन्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं निःस्वार्थपणे काम केले. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विनाकारण कमी करणे. अश्या विविध समस्यावर मात करून सोडविण्यात यशस्वी झालेत. त्यांच्या या आठवणी आजही ताज्या आहेत. ते हयात नसले तरी त्यांचे आदर्श विचार आजही सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रेरणादायी आहेत. असे जे आपल्या कामाने आजरामर झालेले कॉ. मारुतराव निकम. *मरावे परी किर्तिरूपी उरावे* असे आदर्श व्यक्तिमत्वआणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संघटनेचे माजी अध्यक्ष कॉ. मारुतीराव निकम यांच्या जयंती निमित्त कंदलगाव ता. करवीर या त्यांच्या मूळ गावी वृक्षारोपण करण्यात आले. कॉ. निकम. यांनी भोगावती साखर कारखाना येथे शेती विभागात रिसर्च असिस्टंट असताना मोठ्या प्रमाणात या परिसरात वृक्ष लागवड केली होती. आपल्या राजकीय आयुष्यात सुध्दा त्यांनी निसर्ग संवर्धनासाठी खूप मोठे काम केले. आणि त्याचाच आदर्श वारसा जपत. आज कॉ.निकम. यांच्या कुटुंबीयांनी शेतामध्ये वृक्ष लागवड केली. व दरवर्षी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प यावेळी केला. यावेळी मोहन निकम, मदन निकम, उपसरपंच उत्तम पाटील, पोलिस पाटील अजित पाटील, निवास निकम, संग्राम पाटील, निलेश निकम, सागर पाटील, सुनील पाटील, निकम कुटुंबीय व गावकरी उपस्थीत होते.
*वडिलांच्या आदर्श विचारांचा वारसा असाच चालू ठेवणार*. ..........
आमचे वडील कॉ. मारुतराव निकम. यांचे आदर्श विचारांची शिदोरी बरोबर घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कष्टकरी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार. वडिलांचे आदर्श विचार सदैव जिवंत ठेवणार.
कॉ. मदन निकम.
No comments