Header Ads

Header ADS

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गतशेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन


कोल्हापूर, दि. 1  : सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके, अंतर्गत खरीप हंगामामध्ये सलग पीक प्रात्यक्षिके (पिक-नाचणी व वरई) या बाबींतर्गत शेतकऱ्यांना बियाणांचा, निविष्ठांचा लाभ मिळणार आहे.

पीक प्रात्यक्षिके- तृणधान्य कार्यक्रमामाधील पीक प्रात्यक्षिकांतर्गत (पीक-नाचणी व वरई) एका शेतकऱ्याला ½ एकर मर्यादेत बियाणांचा, निविष्ठांचा लाभ दिला जाणार असून या योजनेंतर्गत अनुदानावर फुले नाचणीच्या उन्नत वाणाचे बियाणे देण्यात येणार आहेत.

बियाणे, निविष्ठांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आत्मा गट, शेतकरी गट, मागासवर्गीय व आदिवासी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. मार्गदर्शक सुचनेमध्ये काही बदल झाल्यास त्याप्रमाणे प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल.

 या कामासाठी संबंधित शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकाऱ्याशी संपर्क साधून  6 जून पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले.

No comments