हेल्थकेअर सेक्टरमध्ये मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सिंधुदुर्गनगरी दि.1.- सध्या राज्यामध्ये कोविड -19 या साथीच्या आजारावरील रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडीकल क्षेत्रातील प्रशिक्षीत मानव संसाधनाची तीव्र कमतरता जाणवत असून यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाशी पॅरामेडीकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी हेल्थ केअर सेक्टर स्कील कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे तसेच या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुडवडा दूर व्हावा, याकरिता आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या राज्यातील युवक युवतींसाठी हेल्थकेअर, मेडिकल व नर्सिंग व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) अंतर्गत मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, खाजगी रुग्णाले, वैद्यकीय शिक्षण संस्था ज्यांच्याकडे 20 पेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत. अशा रुग्णालयांची ग्रीन चॅनेलव्दारे व्यवसायिक प्रशिक्षण संस्था (VTI) म्हणून निवड करण्यांत येणार आहे. जिल्ह्यातील जी रुग्णालये उमेदवारांना प्रशिक्षण देण्यास इच्छूक आहेत त्यांनी (VTI) म्हणून नोंदणी करावी.
जिल्ह्यातील जे उमेदवार हेल्थकेअर, मेडिकल व नर्सिंक व डोमेस्टिक वर्कर या क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास इच्छूक आहेत अशा उमेदवारांनी आपली नोंदणी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांचे कडे करावी.
नोंदणी करण्यास अडचणी येत असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग दूरध्वनी क्रमांक 02362228835 व मोबाईल क्रमांक 9403350689 किंवा ईमेल आयडी sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा असे आवाहन कृ.वि. कविटकर ककौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
No comments