Header Ads

Header ADS

शरद पवार हे सगळ्यांचे गॉडफादर, म्हणूनच… चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण



राज्यातील मराठा समाजाला शरद पवार यांच्यामुळंच आरक्षण मिळालं नाही. या सरकारला कुणाला आरक्षण द्यायचंच नाही,’ असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. याबाबत जेव्हा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना विचहरण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, शरद पवार हे सगळ्यांचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहेत. स्वत:च्या पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षावरही त्यांचा कंट्रोल आहे. त्यामुळं निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून त्यांची जबाबदारी आहे.


‘मराठा आरक्षणावर जाहीर वादविवाद करण्याची माझी तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी वाचला आहे. राज्य सरकारनं केलेल्या चुका त्या निकालातून स्पष्ट दिसत आहेत. सरकारचा निष्काळजीपणा दिसतो आहे. तेच ओबीसींच्या बाबतीत झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं वटहुकूम काढून ओबीसींचं राजकीय आरक्षण तात्पुरतं टिकवलं होतं. त्यानंतर आमचं सरकार गेलं. आता वटहुकूमचा कायदा करून ते टिकवायला हवा होता. ते केलं गेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह मागास आयोगाचा आहे. तो स्थापन झालेला नाही. राजकीय आरक्षण का, यामागचा तर्क सर्वोच्च न्यायालयाला हवा आहे, तो दिला जात नाही,’ असा आरोपही पाटील यांनी केला.

No comments